एअर इंडिया, इंडिगोच्या विमान आयातीला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2023 02:11 PM2023-08-05T14:11:24+5:302023-08-05T14:12:19+5:30

अलीकडेच एअर इंडिया कंपनीने ४७० नव्या विमानांची खरेदी करत असल्याची घोषणा केली होती, तर इंडिगो कंपनीनेही ५०० नव्या विमानांच्या खरेदीची घोषणा केली होती. 

Green signal for Air India and IndiGo's aircraft imports | एअर इंडिया, इंडिगोच्या विमान आयातीला हिरवा कंदील

एअर इंडिया, इंडिगोच्या विमान आयातीला हिरवा कंदील

googlenewsNext

मुंबई : एअर इंडिया आणि इंडिगो यांनी नव्या विमानांसंदर्भात केलेल्या खरेदी घोषणेनंतर आता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) त्यांना या नव्या विमानांच्या आयातीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अलीकडेच एअर इंडिया कंपनीने ४७० नव्या विमानांची खरेदी करत असल्याची घोषणा केली होती, तर इंडिगो कंपनीनेही ५०० नव्या विमानांच्या खरेदीची घोषणा केली होती. 

बोईंग आणि एअर बसकडून खरेदी
नव्या विमानांना भारतात दाखल करून घेण्यासाठी या कंपन्यांना डीजीसीएची मंजुरी घेणे अनिवार्य असते. त्यानुसार या कंपन्यांनी डीजीसीएकडे मंजुरी मागितली होती. त्याला डीजीसीएने हिरवा कंदील दिला आहे. बोईंग आणि एअर बस अशा दोन्ही कंपन्यांकडून एअर इंडिया विमानांची खरेदी करणार आहे, तर इंडिगो कंपनीने आपल्या विमान खरेदीसाठी एअर बस कंपनीला पसंती दिली आहे.
 

Web Title: Green signal for Air India and IndiGo's aircraft imports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.