...हा तर हुक्का पार्लरला ग्रीन सिग्नल, राज्य सरकारची अधिसूचना; दुर्घटनेच्या दहा दिवस आधी पालिकेने काढले परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:04 AM2018-01-12T02:04:01+5:302018-01-12T02:04:06+5:30
कमला मिल कम्पाउंडमध्ये १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आग हुक्क्यामुळे लागल्याचे उघड झाल्यानंतर मुंबईतील हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेमुळे हुक्का पार्लरला ग्रीन सिग्नल मिळाल्याचे चित्र आहे. या दुर्घटनेच्या दहा दिवस आधी ही अधिसूचना काढण्यात आली आहे.
मुंबई : कमला मिल कम्पाउंडमध्ये १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आग हुक्क्यामुळे लागल्याचे उघड झाल्यानंतर मुंबईतील हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेमुळे हुक्का पार्लरला ग्रीन सिग्नल मिळाल्याचे चित्र आहे. या दुर्घटनेच्या दहा दिवस आधी ही अधिसूचना काढण्यात आली आहे.
मुंबईत अनेक उपाहारगृहांमध्ये राजरोसपणे हुक्का पार्लर चालविले जातात. अशा पार्लरमुळे तरुण पिढी वाया जात असल्याने हुक्का पार्लर बंद करावेत, अशी मागणी ब-याच काळापासून होत आहे. कमला मिल कम्पाउंडमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबव्ह या पबमध्ये २९ डिसेंबरला आगीचा भडका उडून १४ जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमागे मोजोसमधील हुक्का पार्लर कारणीभूत असल्याचा अहवाल अग्निशमन दलाने दिला. या दुर्घटनेने हुक्का पार्लरमध्ये धगधगणाºया कोळशांचा संभाव्य धोका दाखवून दिला.
एकीकडे हुक्का पार्लरवर कारवाईची मागणी होत असताना राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने अधिसूचना काढून एक प्रकारे हुक्क्याला परवानगीच दिली. आतापर्यंत हुक्का पार्लरला पालिकेकडून परवानगी मिळत नव्हती. मात्र या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ लागू झाला आहे. त्यानुसार बीअर बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, डिस्को थेक, दारू व मद्याची दुकाने, सिनेमागृहे उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. या यादीत हुक्का पार्लरचाही समावेश आहे. त्यामुळे पालिकेनेही हे परिपत्रक काढले आहे.
आस्थापना उघडण्याची वेळ बंद करण्याची वेळ
बीअर बार, परमिट रूम, हुक्का
पार्लर, डिस्को थेक सकाळी ११.३० मध्यरात्री दीड वाजता बंद
दारू व दारूची दुकाने सकाळी ११.३० रात्री ११.३० वाजता
चित्रपट, सिनेमागृह — मध्यरात्री १ वाजता