ग्रीन सिग्नल... ‘मरे’वर रविवारी मेगाब्लॉक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 08:25 AM2023-01-07T08:25:40+5:302023-01-07T08:25:59+5:30

विविध डागडुजीची कामे करण्यासाठी ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक नसणार आहे.

Green signal... No megablock on Sunday on 'Murray' | ग्रीन सिग्नल... ‘मरे’वर रविवारी मेगाब्लॉक नाही

ग्रीन सिग्नल... ‘मरे’वर रविवारी मेगाब्लॉक नाही

googlenewsNext

मुंबई : विविध डागडुजीची कामे करण्यासाठी ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक नसणार आहे.

ट्रान्सहार्बर रेल्वे

कुठे : ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत
परिणाम : ठाणे येथून  सकाळी १०:३५ ते सायंकाळी ४:०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी 
सुटणाऱ्या आणि 
वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०:२५ ते सायंकाळी ४:०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हार्बर रेल्वे

कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर 
कधी :  सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:०९ वाजेपर्यंत  आणि
 चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत
परिणाम :  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून  सकाळी ११:०४ ते सायंकाळी ४:४७ वाजेपर्यंत या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:४८ ते सायंकाळी ४:४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाऊन  हार्बर मार्गावरील सेवा रद्द  राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०:०७ ते दुपारी ३:२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Web Title: Green signal... No megablock on Sunday on 'Murray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.