Join us

काँक्रिटच्या जंगलात बहरणार हिरवळ; महापालिकेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 1:28 AM

मुंबईत ६० ठिकाणी जपानी पद्धतीची छोटी उद्याने

मुंबई : काँक्रिटच्या जंगलात हिरवळ नष्ट होत असल्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा मोठ्या प्रमाणात हरितपट्टा निर्माण करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केला आहे. यासाठी जपानी पद्धतीने कमी वेळेत ६० ठिकाणी शहरी वने उभी राहणार आहेत.पालिका आयुक्तांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी परळ ते दहिसर या पट्ट्यात ६० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईत आतापर्यंत मोकळी जागा महापालिकेला सापडलेली नाही. तर उपनगरातील काही मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने आणि उद्यानांची जागा यासाठी निवडण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क आणि पवई हिरानंदानी उद्यान अशा प्रसिद्ध उद्यानांमधील काही मोकळ्या जागांवर ‘मियावाक’ या जपानी पद्धतीने शहरी वने तयार करण्यात येणार आहेत.अशी आहे जपानी पद्धतजपानच्या वनस्पतीशास्त्रझ अकिरा मियावाक यांनी शहरी वने ही संकल्पना आणली. त्यानुसार झाडांची वाढ झटपट व दहापट जलदगतीने होते. यामुळे जास्तीतजास्त झाडांचे रोपण करणे शक्य होते. बंगरूळुमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये या पद्धतीने छोटी उद्याने तयार करण्यात आली आहेत. रस्त्यावर लावलेल्या झाडांचे आयुर्मान कमी असते. त्यामुळे सुमारे दोन लाख चौ.मी. जागेत झाडे लावून जंगल तयार करण्यात येणार आहे. तेथे कोणतेही काँक्रिटीकरण केले जाणार नाही. केवळ मातीचा वापर केला जाणार आहे.यासाठी वृक्ष रोपणाचा निर्धारमुंबईतील काँक्रिटीकरणामुळे येथे लावलेल्या झाडांची मुळे कमकुवत आहेत. कमी वेळेत ही झाडे उन्मळून पडत असल्याने मुंबईतील हरितपट्टा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे नवीन उद्याने, शहरी वने तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार चार हजार चौ. मी. जागेत निवासी संकुले विकसित करताना तेथील सात टक्के मोकळ्या जागेवर अशी नंदनवने उभी राहणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च प्रत्येक हेक्टरमागे दोन कोटी एवढा असेल, तीन वर्षांत मुंबईत अशी शहरी वने तयार होतील.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका