Join us

अभिवादन घटनाकारांना, 26/11 च्या शहिदांना

By admin | Published: November 26, 2014 10:42 PM

देशाच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुतेची शिकवण देणारे भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण करण्यात आले होते.

पेण : देशाच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुतेची शिकवण देणारे भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण करण्यात आले होते. त्याला आज स्वातंत्र्यानंतर 65 वष्रे झाली. या दिवसाची एकूणच महती सर्वत्र परिचित आहे. याच दिवशी 26 नोव्हेंबर 2क्क्8 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांचा बीमोड करताना ज्या पोलीस अधिकारी, कमांडो व पोलीस शिपायांनी आपले कर्तव्य बजावताना प्राणार्पण केले, त्या शहिदांना व बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण o्रद्धांजली वाहण्यात आली. 
संविधान दिवस व 26/11 च्या शहिदांना o्रद्धांजली अशा दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या अनुषंगाने प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच पत्रकार संघ, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राचार्य सदानंद धारप, एनएसएसचे प्रमुख प्रा. काणोकर, पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रल्हाद रोडे अशा विविध क्षेत्रतील मान्यवरांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे या पोलीस अधिका:यांना भावपूर्ण o्रद्धांजली वाहण्यात आली. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला सहा वष्रे पूर्ण झाली मात्र याबाबतच्या आठवणी नागरिकांच्या मनात ताज्या आहेत. 
जि.प. च्या सर्व शाळांमध्ये भारतीय संविधानाप्रति निष्ठा दाखवून मूल्य शिक्षणाच्या तासाला संविधानाचे सामूहिक वाचनाचा कार्यक्रम व त्या अनुषंगाने प्रश्नमंजूषा व शालेय कार्यक्रम घेण्यात आले.
 
जिल्हा परिषदेमध्ये संविधान दिन
4अलिबाग : बुधवारी रायगड जिल्हा परिषदेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणो मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. 
त्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. 
 
4रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, पेण प्रांत तथा सहाय्यक जिल्हाधिकारी निधी चौधरी, रोहा प्रांत सुभाष भागडे, महाड प्रांत सुषमा सातपुते आदी उपस्थित होते.