अनिरूद्ध पाटील ल्ल बोर्डी
वादळी वारे आणि उसळणा:या लाटांनी बोर्डी परिसरातील समुद्रकिना:याची अमर्याद धुप होत आहे. मर्यादावेल व तिवरांमुळे किना:याचे नैसर्गिकरीत्या संरक्षण, संवर्धन होते. मात्र रेती उपसा, पर्यटकाचे अविवेकी वर्तनाने पर्यावरणाचा :हास रोखण्यात प्रशासन हतबल ठरल्याची टिका नागरीकांतुन व्यक्त होत आहे.
वादळी वारे व उधाणातील लाटांमुळे नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी, झाई, समुद्रकिना:याची धुप झाली आहे. गेल्या दशकापासून धुपीचे प्रमाण वाढत आहे. भरतीचे, पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रतिवर्षी किना:यालगत सुरू बागेची रांग उन्मळुन पडते. समुद्रातील तिवरांची झाडे आणि किना:यावरील मर्यादावेल नैसर्गिक धुप नियंत्रणाचे कार्य करतात. तिवरांमुळे तीव्र लाटांचा वेग मंदावतो. पावसाळ्यात मत्स्य बिजांकरीता नर्सरीचे काम केले जाते. मर्यादावेल, वाळुवर फोफावतो. जाड गडद हिरवी आपटय़ाच्या आकारातील पान असतात. पेराद्वारे वेलींची निर्मिती होऊन अल्पावधीत घनदाट जाळी पसरते. माती घट्ट झाल्यावर र्दुव्याप्रमाणो अन्य गवत वाढते. उन्हाळा, पावसाळ्यात सोसाटय़ाच्या वा:यापासून धुपनियंत्रण होते. फुले अन वेलींचा गालीचा सौदर्यात भर टाकतो. परिसंस्थेतील जैवविविधता टिकवण्याचे मोलाचे कार्य होते. दात व पोट दुखीवर पानांचा औषधी वापर केला जातो. खळ्यासह लहान मुलांच्या बारशाच्यारीतीत अनन्य साधारण स्थान आहे.
मात्र परगावातील पर्यटक किना:यावर वाहन उभी करतात. दिवसाढवळ्या रेतीचे उत्खन्न केले जाते. प्रशासनाकडून कारवाई होत नाही. सातबा:याचे ऑनलाईन, निवडणुकांचे काम, मिटींग इ. सबबी तलाठी सर्कल देत असल्याची खंत नागरीकांनी व्यक्त केली आहे. डहाणूचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अनिष्ठ प्रवृत्ती विरूद्ध मोहीम उघडतील असा आशावाद पर्यावरण प्रेमींनी आहे.