--
विशेष गौरव पुरस्कार
मुंबई : इयत्ता दहावी व बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना दहा हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी १५ ऑक्टोबरपर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी. आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा.
-------------------
पुरस्कारासाठी नामांकने पाठवा
मुंबई : देशासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेने नामांकने पाठविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.भि.मोरये यांनी केले आहे. राष्ट्रीय एकात्मता दिन, ३१ ऑक्टोबर रोजी पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. कार्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग ३१ ब यांच्याकडे पाठवावयाची आहे.
-------------------
रोजगार मेळावा
मुंबई : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सारखे असणाऱ्या किंवा ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत.