Join us

यंदा महामानवाला अभिवादन ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:15 AM

महापालिका : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण ...

महापालिका : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमी स्मारकावर येऊ नये. ऑनलाइन अभिवादन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्ग स्थिती पाहता समाज माध्यमांद्वारे केले आहे.

प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यांना महापालिकेच्या वतीने विविध नागरी सेवासुविधा पुरविल्या जातात. मात्र कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरून अनुयायांनी अभिवादन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली आहे.

* अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण

महापरिनिर्वाण दिनाची तयारी सुरू आहे. चैत्यभूमी वास्तू तसेच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येईल. चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तींसाठी नियंत्रण कक्ष उभारला जाईल. १ अग्निशमन इंजीन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षारक्षक तैनात केले जातील. शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण केले जाईल. त्याची लिंक सार्वजनिकरीत्या दिली जाईल.

--------------------------