शिवजयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:13 AM2021-02-20T04:13:18+5:302021-02-20T04:13:18+5:30
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहसनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र ...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहसनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारी वादक हे या शिवजयंती सोहळ्याचे आकर्षण ठरले. याप्रसंगी विधान मंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, विशेष कार्य अधिकारी अनिल महाजन, विधान परिषद यांचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे, संचालक,वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र,म.वि.स.निलेश मदाने, मुख्य सुरक्षा अधिकारी, महेश चिमटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
--*---
शिवजयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जे. जे. वळवी यांच्यासह राज शिष्टाचार विभाग आणि मंत्रालय अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.