मुंबई : ऐन पगाराच्या दिवशीच मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे शासकीय कर्मचाºयांची तारांबळ उडाली. त्यांच्या खात्यातील पगार हरयाणाच्या एटीएममधून काढण्यात आल्याचे मेसेज होते. यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकांसह ५० हून अधिक कर्मचारी आणि अधिका-यांचा समावेश आहे. या प्रकरणी त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली.चर्नी रोड परिसरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील विभागीय उपसंचालक पौर्णिमा गेडाम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, एक्सिस बंकेत असलेल्या बचत खात्यात १ ते ५ तारखेदरम्यान शासकीय कर्मचाºयांंचा पगार होतो. ४ तारखेला याच खात्यातून १५ हजार ६१५ रुपये काढल्याचा मेसेज आला. हे पैसे हरयाणातील गुडगावच्या एटीएममधून काढले. त्यांच्या विभागातील ३, महाराष्ट्र शिक्षण परिषदेतील ४ आणि शासकीय मुद्रणालयातील ४५ जणांचा यामध्ये समावेश आहे. रविवार ते मंगळवार या ३ दिवसांत हे पैसे काढल्याचे मेसेज कर्मचाºयांना आले. त्यांच्या खात्यातून १५ ते ५० हजार रुपयांची रक्कम काढली आहे. या प्रकरणी गेडाम यांनीही मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.या कार्यालयाच्या खाली ३ बँकांचे एटीएम आहेत. तेथून त्यांनी अखेरचे पैसे काढले होते. येथून कार्ड क्लोनिंग केली असल्याचा संशय कर्मचाºयांना आहे. यामध्ये ५० हून अधिक कर्मचाºयांचे पैसे गेल्याचा संशय आहे.>गुन्हा दाखल करणार...खात्यातून पैसे गायब होत असल्याबाबत तक्रार अर्ज येत आहे. सर्व अर्ज एकत्रित करून गुरुवारी सायबर गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करून, अधिक तपास सुरू असल्याचे मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितले.
शासकीय अधिका-यांचे पगार गायब, मरिन ड्राइव्हमध्ये तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:27 AM