Join us

किराणा दुकानांची कोरोना काळात डिजिटल व्यवहारात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:06 AM

मुंबईसह महाराष्ट्रातील ग्राहक टेक्नोसॅव्हीसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान अधिकाधिक व्यवहार ...

मुंबईसह महाराष्ट्रातील ग्राहक टेक्नोसॅव्ही

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान अधिकाधिक व्यवहार हे डिजिटल करण्यावर भर दिला जात असून, मॉलला टक्कर देणाऱ्या किराणा मालाच्या दुकानांनी यात आघाडी घेतली आहे. मुंबईत २.५ लाख किराणा मालाच्या दुकानांपैकी ३० ते ४० हजार किराणा मालाच्या दुकानांनी साहित्याच्या खरेदी-विक्रीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला. तर मुंबईच्या १.२५ कोटी लोकसंख्येपैकी ७५ हजार ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानातून साहित्य खरेदी-विक्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे.

राष्ट्रीय, राज्य आणि शहर पातळीवर डिजिटल व्यवहार करण्यात किराणा मालाची दुकाने आघाडीवर असून, शहरीकरण होत असलेल्या तामिळनाडूसह महाराष्ट्रात किराणा मालाच्या दुकानांनी अधिकाधिक व्यवहार हे डिजिटल केले आहेत. संपूर्ण देशभरात किराणा मालाच्या दुकानांची संख्या १.२ कोटी आहे. यापैकी १० लाख किराणा मालाच्या दुकानांनी साहित्याची खरेदी-विक्रीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला. महाराष्ट्रात किराणा मालाच्या दुकानांची संख्या १० लाखांच्या आसपास आहे. मुंबईत किराणा मालाच्या दुकानांची संख्या २.५ लाख आहे. महाराष्ट्रातील १० लाख किराणा मालाच्या दुकानांपैकी १ लाख किराणा मालाच्या दुकानांनी साहित्याच्या खरेदी-विक्रीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला. मुंबईतल्या २.५ लाख किराणा मालाच्या दुकानांपैकी ३० ते ४० हजार किराणा मालाच्या दुकानांनी साहित्याच्या खरेदी-विक्रीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला.

देशातील १०० कोटी लोकसंख्येपैकी १५ टक्के लोकांनी किराणा मालाच्या दुकानातील साहित्याच्या खरेदी-विक्रीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला. तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून, महाराष्ट्रातील ३५ ते ४० टक्के लोकसंख्या शहरात राहते. राज्यातील ११ कोटी लोकसंख्येपैकी २ लाख ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला. मुंबईची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे. तर येऊन जाऊन ही लोकसंख्या १ कोटी ७५ लाखांच्या आसपास धरली जाते. ७५ हजार ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानातून साहित्य खरेदी-विक्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला.

२५ कोटी जणांचा व्यवहारासाठी अ‍ॅपचा वापर

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ग्राहकांचा आकडा वाढत आहे. कोरोना काळात हा आकडा आणखी वाढला आहे. विशेषतः ज्या वेळी मॉल बंद होते तेव्हा किराणा मालाच्या दुकानांनी ग्राहकांना आधार दिला आहे. तर देशभरात ५५ कोटी लोकांकडे नेट वापरण्याची सुविधा आहे. यातील २५ कोटी लोक मोबाइल अ‍ॅपचा वापर अशा प्रकाराच्या खरेदी-विक्रीसाठी करतात, अशी माहिती सदर तंत्रज्ञानाशी निगडित तज्ज्ञ कुमार वेंबू यांनी दिली.