गट, गण पूर्वीइतकेच

By admin | Published: September 28, 2016 01:37 AM2016-09-28T01:37:12+5:302016-09-28T01:37:12+5:30

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेवर शासनाने सोमवारी रात्री अधिसूचना जारी करून अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेले सहा गट कमी होणार आहेत.

Group, same as before | गट, गण पूर्वीइतकेच

गट, गण पूर्वीइतकेच

Next

- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेवर शासनाने सोमवारी रात्री अधिसूचना जारी करून अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेले सहा गट कमी होणार आहेत. पनवेल तालुका पंचायत समितीचे गण कमी होणार आहेत. तरीसुद्धा संख्याबळ पूर्वीइतकेच राहणार आहे.
इतर तालुक्यात नगरपंचायती स्थापन झाल्याने, साहजिकच जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या कमी झाली आहे. महाड, खालापूर, अलिबाग, उरण, पेण आणि रोहा या तालुक्यांत प्रत्येकी एक गट कमी झाला आहे. मात्र, पनवेल तालुक्यात उलटी स्थिती आहे.
पनवेल शहर, नवीन पनवेल आणि खांदा वसाहत पनवेल नगरपालिका हद्दीत येतात. त्यामुळे या परिसराचा समावेश ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत होत नाही, परंतु कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, करंजाडे, उलवे, नावडे येथे शहरीकरण झालेले आहे. त्यामुळे पुनर्रचनेत जवळपास सहा जिल्हा परिषद गट वाढले होते. गेल्या १० वर्षांत पनवेल, सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या गावांतील लोकसंख्या कमालीची वाढली आहे.
पालिका हद्द वगळता इतर ठिकाणी सहा लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती झाली आहे.
२00१ला झालेल्या जनगणनेच्या तुलनेत २0११च्या जनगणनेतील लोकसंख्या सुमारे दुपटीने
वाढली आहे.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या पुनर्रचनेत वाढली होती. पूर्वी पनवेलमधून १० जिल्हा परिषद सदस्य निवडून जायचे. नवीन रचनेत पनवेल तालुक्यात सोळा गटनिर्माण झाले होते.
मात्र, आता नैना क्षेत्रातील गावे वगळून इतर २९ गावांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्रचनेत वाढलेले सहा जिल्हा परिषद गट कमी होणार आहेत. त्याचबरोबर, पंचायत समितीचे १२ गण कमी होणार आहेत. तरीसुद्धा १५ तालुक्यांचा विचार करता, पनवेल वगळता कोणत्याही तालुक्यात नवीन रचनेनुसार दोनअंकी संख्या नाही.
अलिबाग- सहा, कर्जत- पाच, पेण व रोहा येथे प्रत्येकी चार गट असणार आहेत. इतर ठिकाणी दोन आणि तीन इतकीच संख्या राहिलेली आहे. पनवेल तालुक्यात महानगरपालिका झाली तरी १०
इतकी सदस्य राहणार आहेत. कळंबोली, कामोठे, खारघर आणि नागरीकरण झालेला पट्टा महापालिकेत जाईल.

महानगरपालिकेत समाविष्ट गावे
१. तळोजे पाचनंद, २. काळुंद्रे, ३. खारघर, ४.ओवे, ५.देवीचा पाडा, ६.कामोठे, ७.चाळ, ८.नावडे, ९.तोंढरे, १०.पेंढर, ११.कळंबोली, १२. रोडपाली, १३.खिडुकपाडा, १४. पडघे, १५. वळवली, १६. पाले खुर्द, १७. टेंभोडे, १८.आसूडगाव, १९.बीड, २०.आडीवली, २१. रोहिंजण, २२.धानसर, २३. पिसार्वे, २४. तुर्भे, २५. करवले बुद्रुक, २६. नागझरी, २७. तळोजा मजकूर, २८. घोट, २९.कोयनावेळे

Web Title: Group, same as before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.