श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात महिलांचे सामूहिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण

By सचिन लुंगसे | Published: August 24, 2022 09:09 PM2022-08-24T21:09:10+5:302022-08-24T21:12:08+5:30

नोंदणी अर्ज न्यासाच्या जनसंपर्क कक्षामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जं भरण्यास अंतिम मुदत  १ सप्टेंबर सायंकाळी ५ पर्यंत असेल.

Group Shree Ganesh Atharvashirsha Pathan by women in the premises of Sri Siddhivinayak Ganapati Temple | श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात महिलांचे सामूहिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात महिलांचे सामूहिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण

googlenewsNext

मुंबई - श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ४.३० या कालावधीत मंदिर प्रांगणात महिलांसाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात सामूहिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता शंखनादाने करून, तीन वेळा ओंकार म्हणून गणेश वंदना करण्यात येईल. त्यानंतर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर श्री गणेशाचे ( श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया ) नामस्मरण करण्यात येईल. नामस्मरण झाल्यानंतर सामूहिक महाआरती करून श्रीगणेशाचे दर्शन होईल.

नोंदणी अर्ज न्यासाच्या जनसंपर्क कक्षामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जं भरण्यास अंतिम मुदत  १ सप्टेंबर सायंकाळी ५ पर्यंत असेल. कार्यक्रमाची सुरुवात बरोबर सायंकाळी ४ वाजता होणार असून महिलांनी दुपारी ३ पर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Web Title: Group Shree Ganesh Atharvashirsha Pathan by women in the premises of Sri Siddhivinayak Ganapati Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.