मुंबई : आई होण्याची चाहूल लागल्यावर महिला आनंदित होतात. मात्र गर्भधारणा झाल्यावर काय काळजी घ्यावी, कोणत्या तपासण्या करून घ्याव्यात याची पूर्ण माहिती नसल्यामुळे आणि काही आजारांमुळे मुंबईसारख्या शहरामध्येही मातामृत्यूचे प्रमाण वाढताना दिसते आहे. मातामृत्यू कमी करायचे असतील तर गर्भारपणात महिलांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांनीदेखील त्यांची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल आणि मे 2क्14 या कालावधीमध्ये 61 मातांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन वर्षापासून मातामृत्यूंची आकडेवारी वाढताना दिसत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आह़े हे टाळण्यासाठी गर्भधारणा झाल्यापासूनच महिलांनी काळजी घेणो अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी साध्या गोष्टी पाळल्या तरी मातामृत्यूचे प्रमाण नक्कीच घटू शकते. गर्भधारणा झाल्यावर महिलांनी रुग्णालयात नावनोंदणी केलीच पाहिजे. याचबरोबरीने डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या योग्य त्या वेळी करून घेतल्या पाहिजेत. यामुळे पुढे प्रसूतीमध्ये कोणत्या प्रकारची गुंतागुंत होईल का, याचा अंदाज डॉक्टरांना येतो.
कोणत्या प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते, हे वेळीच कळल्यास त्यावर उपाय करता येऊ शकतात. मात्र प्रसूतीदरम्यान अशा प्रकारची गुंतागुंत निर्माण झाल्यास वेळ कमी असतो आणि उपाय करणो अनेकदा शक्य होत नाही, असे प्रोफर्ट आयव्हीएफ फर्टिलिटी क्लिनिकचे डॉ. अरुण आपटे यांनी सांगितले.
शहरी महिलांमध्ये वजन जास्त असणो, मधुमेह, रक्तदाब असणो अशा कारणांमुळे प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत वाढते; तर ग्रामीण भागातील महिलांना अॅनिमियासारखा आजार असतो, मात्र प्रसूतीपूर्व तपासणी केलेली नसते. सकस आहार मिळत नाही, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, अशा कारणांमुळे या महिलांमध्ये प्रसूतीदरम्यान गुंतागुंत वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. महिलांना प्रसूतीदरम्यान शक्तिवर्धक औषधे दिली जातात. ती औषधे दोन दिवस घेतल्यावर त्यांना काहीतरी त्रस होतो़ मग अशावेळी त्या स्वत: औषधे घेणो बंद करतात. हे योग्य नाही. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. गर्भधारणा म्हणजे महिलांच्या शरीरावर अतिरिक्त ताण येतच असतो. यामध्ये जर त्यांना मानसिक ताण वाढला तर त्यांच्या गर्भावर आणि अप्रत्यक्षपणो त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होताना दिसतो. गर्भधारणा झाल्यावर योग्य वेळी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्वाचा समावेश असणो गरजेचे असते. चिकन, अंडे गर्भवती महिलांनी जास्त प्रमाण खाल्यास उष्ण पडते, म्हणून गर्भवती महिला हे अन्नपदार्थ टाळतात. मात्र प्रत्यक्षात आहारामध्ये याचा समावेश असला पाहिजे. दूध प्यायले
पाहिजे, असे डॉ. आपटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शहरी महिलांमध्ये प्रसूतीदरम्यान गुंतागुंत वाढण्यासाठी वजन जास्त असणो, मधुमेह, उच्च रक्तदाब असणो ही कारणो प्रामुख्याने दिसून येतात.
ग्रामीण भागातील अनेक महिलांना अॅनिमिया (पांडुरोग) असतो, तर काही वेळा पोषण योग्य मिळालेले नसते, प्रसूतीपूर्व तपासण्या केलेल्या नसतात अशा कारणांमुळे त्यांच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत वाढते.
गर्भवतींनी काय काळजी घ्यावी?
च्प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या करा़
च्मातेचे रुग्णालयामध्ये नाव नोंदवा़
च्पौष्टिक आणि सकस आहार घ्या़
च्थोडा व्यायाम करा़
च्डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या़
च्सातव्या महिन्यापासून दुपारी किमान 2 तास झोप घ्या़