ऑनलाईन कर्जाच्या नावाखाली वाढतेय फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:24+5:302021-07-24T04:06:24+5:30

मुंबई : कोरोनामुळे बेरोजगारी वाढली. यातच जवळील जमापूंजीही संपल्याने अनेक जण कर्ज मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. यातच सायबर ठग ...

Growing fraud in the name of online debt | ऑनलाईन कर्जाच्या नावाखाली वाढतेय फसवणूक

ऑनलाईन कर्जाच्या नावाखाली वाढतेय फसवणूक

googlenewsNext

मुंबई : कोरोनामुळे बेरोजगारी वाढली. यातच जवळील जमापूंजीही संपल्याने अनेक जण कर्ज मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. यातच सायबर ठग ऑनलाईन कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याच्या घटना वाढत असल्याचे सायबर पोलिसांच्या निरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्ज घेताना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामटे हे नामांकित वित्तीय संस्था व बँकांच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून त्यावर कर्ज वाटपाबाबत नमूद करण्यात येते. ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी गुगलवर सर्चिंग करणारी मंडळी अशा वेबसाईटला बळी पडतात. अशा संकेतस्थळावरील संबंधित लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करताच, ठग मंडळीकड़ून कॉल येतो.

कर्ज मंजूर होण्यासाठी प्रोसेसिंग फी भरण्यास सांगतात. फी भरताच, लवकरच पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगून कॉल कट होतो. त्यानंतर ठग मंडळीही नॉट रिचेबल होत आहे. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकड़ून करण्यात येत आहे.

काय काळजी घ्याल?

* संकेतस्थळावरील तपशील नेहमी काळजीपूर्वक तपासून घ्या.

* संकेतस्थळ अधिकृत आहे का नाही, याची खात्री करून घ्या.

* कर्जासाठी ज्या नामांकित बँका किंवा वित्तीय संस्थेच्या नावाने संकेतस्थळ आहे, अशा नामांकित बँकिंग वित्तीय संस्थेचा आपल्याजवळील शाखेत जाऊन ते अशा प्रकारची काही सेवा देत आहे का, याची माहिती घ्या.

* अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा.

* फसवणूक होत असल्याचा संशय येत असल्यास जवळील पोलीस ठाण्यात तक्रार द्या किंवा सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार द्या.

देशात अडीच लाख नागरिकांची फसवणुक

प्रधानमंत्री कर्ज योजनेतून कर्ज देण्याच्या नावाखाली देशभरात अडीच लाख नागरिकांची फसवणूक करण्यात आली असल्याची माहिती फेब्रुवारीमध्ये उघड़कीस आली. यात प्रोसेसिंग फीच्या नावाखाली चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. यात अटक करण्यात आलेल्या ठगांनी बनावट ओळखपत्रांच्या आधारे आठ ॲप तयार केले. यात पी.एम.वाय.एल. योजना, पी. एम. भारत लोन योजना, प्रधानमंत्री लोन योजना, सर्वोत्तम फायनान्स, प्रधानमंत्री मुद्रा लोन, भारत योजना लोन, मुद्रा लोन, कृष्णा लोन नावाच्या ॲपचा यात समावेश होता.

Web Title: Growing fraud in the name of online debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.