Join us

सावकाराच्या कर्जाला कंटाळून कंपनी मालकाचे उपोषण, सरकारला साकडे, न्यायाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:10 AM

राजकीय हस्तक्षेप आणि सावकारी कर्जाने त्रस्त एका कंपनी मालकाने सरकारला न्यायासाठी साकडे घातले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत साई कन्ट्रक्शन

मुंबई : राजकीय हस्तक्षेप आणि सावकारी कर्जाने त्रस्त एका कंपनी मालकाने सरकारला न्यायासाठी साकडे घातले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत साई कन्ट्रक्शन अर्थ मुव्हर कंपनीचे मालक सहदेव ननावरे यांनी फसवणूक झाल्याचा दावा केला आहे, तसेच सरकारने न्याय दिला नाही, तर आझाद मैदानात उपोषण करून जीव सोडण्याचा इशाराही त्यांनी दिला.ननावरे यांनी सांगितले की, एका व्यवसायासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यासह एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे व्याज भरण्यास थोडासा विलंब झाल्याने संबंधित लोकांनी व्यवसायातील मोठ्या मशिनरी व कार्यालयासह घरावर कब्जा केला. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कार्यालय व घराचा ताबा मिळाला. पोलिसांनीही या प्रकरणी पंचनामा केला नसल्याचा त्यांचा आरोप आहे.