ऑनलाइन जगातील मुलांचा वाढता वावर धोकादायक, सर्वेक्षणातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:12 AM2020-05-17T01:12:48+5:302020-05-17T01:13:28+5:30
अभ्यासावर याचा परिणाम होत असल्याचे ४६ टक्के मुलांना समजत असूनही मुले स्वत:ला इंटरनेटपासून दूर ठेवू शकत नाहीत.
मुंबई : राज्यातील ४१ टक्के मुले ही एक तासाहून अधिक वेळ इंटरनेटवर असतात, तर केवळ ३ टक्के मुले इंटरनेटचा वापर करत नाहीत. सध्या फेसबुक, आॅनलाइन गेमिंगमधून सायबर क्राइमचा धोका वाढत आहे. तरीही तक्रार न करता मजकूर डिलीट करण्याकडे मुलांचा अधिक कल असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अभ्यासावर याचा परिणाम होत असल्याचे ४६ टक्के मुलांना समजत असूनही मुले स्वत:ला इंटरनेटपासून दूर ठेवू शकत नाहीत. जवळपास १७ टक्के मुलांना फेसबुकच्या माध्यमातून आॅनलाइन गॅम्बलिंग, अनोळखी व्यक्तींकडून छळ होणे, आक्षेपार्ह मजकूर किंवा फोटो मागवून घेणे, अश्लील साहित्य प्राप्त होणे अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना सामोरे जावे लागत आहे. रिस्पॉन्सिबल नेटिझन्स व सायबर पीस फाउंडेशन यांनी एकत्रितरीत्या मुंबई, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार येथील १८ शाळांतील सहावी ते नववी इयत्तेतील आणि १० ते १७ वर्षे वयोगटाच्या मुलांचे यासंदर्भात सर्वेक्षण केले. ११५२ पैकी ११४८ मुलांनी या सर्वेक्षणाला उत्तरे दिली असून यामध्ये मुलींचे प्रमाण ५१ तर मुलांचे प्रमाण ४९ टक्के आहे.
सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे, तर टिकटॉक २६ टक्के, फेसबुक व इन्स्टाग्राम १० टक्के, स्नॅपचॅट, टिंडर, लाइक, टिष्ट्वटर या इतर सोशल मीडियाचा १४ टक्के मुले वापर करतात.
पबजी सर्वाधिक म्हणजे २७ टक्के मुले खेळतात. जीटीए हा खेळ १७ टक्के, तर सीओसी १४ टक्के मुले खेळतात. यामधील १७ टक्के मुले आॅनलाइन गेम जिंकण्यासाठी सतत आॅनलाइन राहतात, तर १२ टक्के मुलांच्या मते जिंकत नाहीत तोपर्यंत गेम थांबवत नाहीत. विशेष म्हणजे सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जवळच्या लोकांनी मदत करू, असे सांगूनही ३६ टक्के मुलांनी ती नाकारल्याचे मान्य केले.
जास्त वेळ आॅनलाइन राहिल्याने २७ टक्के मुली आणि ४८ टक्के मुलांना सायबर क्राइमचा सामना करावा लागत आहे. याला तोंड देण्यासाठी १९ टक्के मुलांनी आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा इतर जबाबदार व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. तर, ९ टक्के मुलांनी याकडे दुर्लक्ष केले. ७ टक्के मुले अजूनही या समस्यांना सामोरी जात आहेत. जास्तीत जास्त मुलांनी त्यांना येणारा सायबर क्राइमचा मजकूर किंवा साहित्य डिलिट करणे व कोणालाही न सांगणे हा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.
उपाययोजना हाती घेणार
सायबर क्राइम मुले कशी हाताळतात, यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सायबर क्राइम नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा आराखडा बनवून आम्ही तो राज्य व केंद्र सरकारला सादर करणार आहोत. मुलांच्या आॅनलाइन सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना हाती घेणार आहोत.
- सोनाली पाटणकर, संस्थापक सदस्य, रिस्पॉन्सिबल नेटिझन्स
सरकार प्रयत्नशील
लॉकडाउनच्या काळात मुले आॅनलाइन शिक्षण, गेमिंग, सर्फिंगच्या माध्यमातून नेहमीपेक्षा इंटरनेटच्या सहवासात जास्त आल्याने त्यांना आॅनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूक करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारकडून यासाठी विविध प्रयत्न होत असून विविध संस्थाही यासाठी प्रयत्न करत असल्याने लाखो मुलांना आपल्याला सायबर क्राइमपासून वाचविता येईल. या सर्वेक्षणातील महत्त्वाच्या तरतुदी शासनाकडून नक्कीच अमलात आणण्यात येतील.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य
आॅनलाइन जगातील मुलांचा वाढता वावर धोकादायक