बीकेसीप्रमाणे एमएमआरमधील विविध भागांत ग्रोथ सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:32 AM2019-08-16T04:32:39+5:302019-08-16T04:33:35+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) स्मार्ट बीकेसी उपक्रम राबवण्यात येत आहे.

Growth centers in various parts of MMR like BKC | बीकेसीप्रमाणे एमएमआरमधील विविध भागांत ग्रोथ सेंटर

बीकेसीप्रमाणे एमएमआरमधील विविध भागांत ग्रोथ सेंटर

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) स्मार्ट बीकेसी उपक्रम राबवण्यात येत आहे. याप्रमाणे एमएमआरडीएमार्फत मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर) बीकेसीप्रमाणे ग्रोथ सेंटर उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यामुळे खासगी उद्योगांना चालना मिळण्यास मदत होईल, असे प्राधिकरणाचे मत आहे.
जमीन मालक आणि एमएमआरडीए असा एकत्रितपणे हा प्रकल्प राबवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ज्या खासगी विकासकाकडे अथवा जमीन मालकाकडे ४०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन उपलब्ध आहे, असा विकासक किंवा जमीन मालक एमएमआरडीएसोबत मिळून ग्रोथ सेंटरचा प्रकल्प राबवू शकतो. यातून येणारा नफा प्राधिकरण आणि जमीन मालक यांच्यामध्ये विभागण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प एमएमआरडीएसोबत मिळून करण्यासाठी जमीन मालकाला विविध अटी असणार आहेत. यामध्ये शक्यतो या जमिनीपासून ३० मीटरच्या अंतराच्या आत तालुका, राज्य अथवा राट्रीय महामार्ग जात असावा, जमीन ही सीआरझेड अंतर्गत नसली पाहिजे, तसेच जमीन वने, पर्यावरणीय संवेदनशील विभागामध्ये नसली पाहिजे, अशा विविध अटी प्राधिकरणाच्या आहेत.

जमीनदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची
प्राधिकरणातर्फे हे ग्रोथ सेंटर पेण, पनवेल, उरण, अंबरनाथ, बदलापूर, पालघर अशा मुंबईलगतच्या भागांमध्ये उभारण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी तेथे जमीन असणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये जागेच्या किमती जास्त असल्याने सर्वसामान्य माणसाला मुंबईमध्ये घर घेणे परवडत नाही. यामुळे मुंबईबाहेर राहावे लागते, मात्र नोकरीनिमित्त मुंबई शहर किंवा बीकेसीत यावे लागते. यामध्ये त्याचे तीन ते चार तास खर्च होतात. जर असे ग्रोथ सेंटर एमएमआरमध्ये झाले तर त्या ठिकाणी उद्योगधंद्यांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील, असे प्राधिकरणाचे मत आहे. यामुळे एमएमआरडीए असे ग्रोथ सेंटर बनवण्यासाठी सकारात्मक आहे. नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचा प्रस्ताव आला होता. याबाबतच्या धोरणास प्राधिकरणाने मंजुरीही दिली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर हे धोरण एमएमआरडीए राबवणार आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन असलेले जमीनदार प्राधिकरणासोबत येऊन हा प्रकल्प राबवतील का, यावर मात्र अद्याप प्र्रश्नचिन्हच आहे.

Web Title: Growth centers in various parts of MMR like BKC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.