वाढवण बंदराबाबत सेनेचे घूमजाव

By admin | Published: February 11, 2016 02:41 AM2016-02-11T02:41:04+5:302016-02-11T02:41:04+5:30

वाढवण बंदर काहीही झाले तरी होऊ देणार नाही अशी गर्जना आजवर करणाऱ्या शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथील प्रचारसभेत याबाबत जनतेला विश्वासात

Growth Harbor | वाढवण बंदराबाबत सेनेचे घूमजाव

वाढवण बंदराबाबत सेनेचे घूमजाव

Next

डहाणू : वाढवण बंदर काहीही झाले तरी होऊ देणार नाही अशी गर्जना आजवर करणाऱ्या शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथील प्रचारसभेत याबाबत जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेने या प्रश्नाबाबत घूमजाव केल्याची तीव्र प्रतिक्रिया येथे उमटली. मच्छीमार आणि शेतकरी तसेच बागायतदार यातही संतापाची लाट निर्माण झाली. उद्धव ठाकरे आज बंदराला ठाम विरोध कायम असल्याची घोषणा करतील अशा अपेक्षेने सभेसाठी मोठ्या संख्येने जमलेल्या मतदारांची यामुळे साफ निराशा झाली.
१९९५ मध्ये वाढवण बंदराचे भूत कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी उतरवले होते. पालघर जिल्हयाचा विकास आम्हालाही करायचा आहे. पण तो वाढवण बंदर, सुसरी धरण, जिंदाल जेटीसाठी येथील स्थानिकांना विस्थापित करून तो करायचा नाही या प्रकल्पांसाठी सर्वांच्या भूमिका जाणून घ्या नंतरच त्याचा विचार करा. असे उद्गगार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. चिंचणीच्या गावदेवी मैदानावर महायुतीचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ‘मेक इन पालघर’ची घोषणा त्यांनी दिली. (वार्ताहर)

अजब योगायोग; युतीला फटका बसणार?
१३ तारखेला पालघर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे आणि नेमक्या याच दिवशी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या करारमदारावर स्वाक्षऱ्या होऊन वाढवण बंदराच्या स्थापनेची व जेएसडब्ल्यूच्या जेटीला परवानगी दिल्याची घोषणा होणार आहे. हा योगायोगदेखील अजब असल्याची चर्चा मतदारांमध्ये होते. शिवसेनाप्रमुखांनी वाढवणला केलेला प्रखर विरोध उद्धवांच्या काळात मवाळ झाला आहे, असेच चित्र दिसते आहे.

Web Title: Growth Harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.