जीएसटी भवनाची दुरवस्था; जीव धोक्यात घालून करावे लागते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:41 AM2019-04-15T06:41:04+5:302019-04-15T06:41:12+5:30

वस्तू व सेवा कर विभागाच्या माझगाव येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथे काम करावे लागत आहे.

GST Bhavanachi duravastha; Life is required to be put in jeopardy | जीएसटी भवनाची दुरवस्था; जीव धोक्यात घालून करावे लागते काम

जीएसटी भवनाची दुरवस्था; जीव धोक्यात घालून करावे लागते काम

googlenewsNext

मुंबई : वस्तू व सेवा कर विभागाच्या माझगाव येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथे काम करावे लागत आहे. अतिशय जीर्ण झालेल्या या इमारतीच्या ९व्या मजल्यावर टेकू लावण्यात आले असून कर्मचाºयांना मृत्यूच्या छायेत काम करावे लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती त्वरित बदलण्यासाठी सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचाºयांमधून केली जात आहे.
राज्याच्या एकूण महसुलापैकी तब्बल ७० टक्के महसूल जीएसटीद्वारे जमा केला जातो. मात्र, जीएसटी मुख्यालयाची अशी दुरवस्था असताना त्याकडे दुर्लक्ष करणाºयांविरोधात कर्मचाºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात या इमारतीच्या सी विंगमधील सहाव्या मजल्यावरील छताचे प्लॅस्टर कोसळून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. त्या कर्मचाºयाला डोक्यावर १० टाके घालावे लागले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला होता. अशी घटना पुन्हा घडण्याची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
>प्लॅस्टर कोसळण्याच्या भीतीने छताला लावला टेकू
टेरेसवर शेड टाकून कार्यालयाचे काम केले जात आहे. छताचे प्लॅस्टर कोसळून धोका होऊ नये म्हणून कर्मचारी हेल्मेट घालून काम करत असल्याचा दावा एका अधिकाºयाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर केला आहे. इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील छताला टेकू लावून ठेवले आहेत. इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील छताला टेकू लावून ठेवले आहेत. त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी व या कार्यालयात येणारे नागरिक या सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या या इमारतीच्या डागडुजीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करून सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी कर्मचाºयांकडून होत आहे.

Web Title: GST Bhavanachi duravastha; Life is required to be put in jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.