मुंबई : शाळेत शिकवत असतानाच खासगी शिकवणी घेणा-या शिक्षकांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्व मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्रच भरून घेण्याचे आदेश गुरुवारी शिक्षण विभागाने जारी केले आहेत. शिवाय हमीपत्र दिल्यानंतरही खासगी शिकवणी घेणाºया शिक्षकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. शाळांमध्ये अध्यापन करतानाच अनेक शिक्षक खासगी शिकविण्या घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेण्यात आली.
मी खासगी शिकवणी घेणार नाही, शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 6:01 AM