तीनही मार्गांवर उद्या खोळंब्याची हमी; मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:29 AM2023-09-09T06:29:31+5:302023-09-09T06:30:03+5:30
सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, दि. १० सप्टेंबर, २०२३ रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, दि. १० सप्टेंबर, २०२३ रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : सीएसएमटी-विद्याविहार अप- डाऊन धिम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांच्या दरम्यान थांबून विद्याविहार स्टेशनवर योग्य डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल- वाशी अप आणि
डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. नेरुळहून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाइन सेवा आणि ठाणे येथून नेरुळकरिता सुटणारी डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट - मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालविल्या जातील. याशिवाय ब्लॉकच्या दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.