शबाना आझमी यांचा जीव वाचविण्यासाठी २ किमी धावला; जवानाचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:38 PM2020-01-30T17:38:25+5:302020-01-30T17:41:10+5:30
सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी अलीकडेच कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला होता. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्या जखमी झाल्या असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यासोबत, सैन्यातील एका जवानाचेही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते. शबाना यांना उचलण्यासाठी जवानाची धडपड या फोटोत दिसत होता. शबाना यांचा जीव वाचविण्यासाठी या जवानाने २ किमी दौड करत घटनास्थळी धाव घेतली होती. या त्याच्या कामाची पोचपावती म्हणून महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा (एमएसएफ) जवान विवेकानंद अनिल योगे यांचं लाईफ सेव्हिंग फाउंडेशनच्यावतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले. सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव
शबाना आझमींच्या अपघाताचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. शबाना आझमींचे पती जावेद अख्तर याच गाडीतून प्रवास करत होते. मात्र, त्यांना या अपघातात साधे खरचटलेही नाही, असे सांगण्यात आले होते. पण सत्य मात्र काही वेगळेच आहे. प्रत्यक्षात जावेद अख्तर अपघातग्रस्त कारमध्ये नव्हतेच. ते दुसऱ्या कारमधून प्रवास करत होते. त्यामुळे ते अपघातातून बचावले. मात्र, या अपघातानंतर जावेद अख्तर यांच्यासह स्थानिक शबाना यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. त्याचवेळी, एमएसएफचा एक जवानही शबाना आझमींच्या मदतीसाठी धावला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत या जवानाने सेवी दिली. त्यामुळे, या जवानाचेही नेटीझन्सकडून कौतुक करण्यात आले होते. सोशल मीडियावर या जवानाचे फोटो व्हायरल होत असून त्यांस कडक सॅल्युट करण्यात आले होते.
शबाना आझमींची मदत करणाऱ्या जवानाला नेटीझन्सचा कडक सॅल्यूट
तर मोठा अनर्थ घडला असता...! शबाना आझमी यांच्या मित्राने केला मोठा खुलासा
शबाना आजमींच्या मदतीसाठी अखेर भारतीय जवान पुढे आला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटीझन्स दिल्या होत्या. शबाना यांनी अनेकदा सरकारविरोधात आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र, सैन्याबद्दल कधीही आक्षेपार्ह बोलल्या नाहीत. तरीही, जवानच त्यांच्या मदतीला आला, असे म्हणत शबाना यांच्यावर काही जणांकडून उपहासात्मक पोस्ट करण्यात आल्या होत्या. तर, या जवानाचं कौतुकही केलं गेलं आहे.
Shabana Azmi's Health : शबाना आझमी यांच्या तब्येतीत सुधारणा, पण कधी मिळणार डिस्चार्ज...
पनवेलच्या रुग्णालयातून विवेकानंदांना पत्ता लागला
अखेर लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे संस्थापक देवेंद्र पथक यांनी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात संपर्क साधला, जेथे शबाना यांन अपघातानंतर दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. तेथून त्यांनी विवेकानंदा यांनी कॉल केलेल्या अॅम्ब्यूलन्सचा नंबर घेतला. त्यानंतर पथक यांना संबंधित जवान एमएसएफमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली. योगे म्हणाले की, 'आपत्तीच्या वेळी लवकर मदत करण्याचे प्रशिक्षण आम्हाला दिले जाते. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मला माहित नव्हते की शबाना आझमी गाडीच्या आत होती. दुसरे कोणी असले असते तरी देखील मी अशाच मदतीसाठी त्वरित हात दिला असता.
देवेंद्र पाठक म्हणाले, 'आमच्या संस्थेचे मूळ उद्दीष्ट हे रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणे हा आहे. विवेकानंदांविषयी माहिती मिळताच पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांना संपर्क साधून विवेकानंद त्यांचा सन्मान गौरव करण्यात आला.'