Join us

टाळेबंदीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री  उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 5:37 PM

वाळकेश्वर येथील आपल्या शासकीय निवासस्थानाहून दौऱ्याची सुरुवात करत तिन बत्ती सिग्नल, मरीन लाईन्स, गेटवे ऑफ इंडिया व नागपाडा परिसराला भेट देत त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सत्य नारायण व झोन १ पोलीस उपायुक्त  शशी कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. 

मुंबई  : वीक एण्ड टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दक्षिण मुंबईतील विविध भागांचा दौरा करत टाळेबंदीच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली. 

वाळकेश्वर येथील आपल्या शासकीय निवासस्थानाहून दौऱ्याची सुरुवात करत तिन बत्ती सिग्नल, मरीन लाईन्स, गेटवे ऑफ इंडिया व नागपाडा परिसराला भेट देत त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सत्य नारायण व झोन १ पोलीस उपायुक्त  शशी कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. 

यंदाच्या आयपीएल हंगामातील वानखडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या मॅचच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज वानखडे स्टेडियम बाहेरील परिसराची देखील पाहणी केली.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केले.