रिंगिंग बेल्सच्या संचालकांचा प्रत्येक स्मार्टफोनमागे 31 रुपयांचा नफा कमावण्याचा दावा
By admin | Published: February 22, 2016 03:23 PM2016-02-22T15:23:40+5:302016-02-22T15:33:06+5:30
'घोषणा केल्याप्रमाणे 251 रुपयांत स्मार्टफोन फक्त देणार नाही तर प्रत्येक फोनमागे 31 रुपयांचा नफाही कमावणार' असा दावा रिंगिंग बेल्सचे संचालक मोहित गोयल यांनी व्यक्त केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 22 - 'घोषणा केल्याप्रमाणे 251 रुपयांत स्मार्टफोन फक्त देणार नाही, तर प्रत्येक फोनमागे 31 रुपयांचा नफाही कमावणार' असा दावा रिंगिंग बेल्सचे संचालक मोहित गोयल यांनी व्यक्त केला आहे. 15 एप्रिलपासून ग्राहकांना फोनचं वितरण करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितल आहे.
टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. मला का लक्ष केलं जातय ? मी काय चुकीचं केलं आहे ? मी किंवा माझ्या कंपनीविरोधात कोणतीही करचुकवेगिरीचा गुन्हा झालाय का ? माझ्याविरोधात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे का ? असे प्रश्नदेखील मोहित गोयल विचारत आहेत. हे सर्व एका रात्रीत झालेलं नाही, आम्हालाही इतरांप्रमाणे उद्योगधंदा करायचा आहे असंदेखील मोहित गोयल मुलाखतीत म्हणाले आहेत.
18 फेब्रुवारीपासून 7 करोड लोकांनी नोंदणी केल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र पहिल्या टप्यात ऑनलाइन बुक केलेल्या फक्त 25 लाख लोकांनाच हा स्मार्टफोन दिला जाणार आहे. तर इतर 25 लाख हँण्डसेट हे ऑफलाइन वितरकांकडून देण्यात येतील. 30 जूनपर्यंत सर्व फोन वितरित केले जातील. ग्राहकांकडून मिळणारे पैसे बँक कंपनीच्या आयसीआयसीमधील बँक खात्यात जमा करण्यात येतील, जोपर्यंत सर्व फोन वितरित केले जात नाहीत तोपर्यंत त्या पैशांना हात लावणार नसल्याचं मोहित गोयल यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.
जगातील सर्वोत स्वस्त स्मार्टफोन 251 रुपयांत देण्याची घोषणा केल्यापासून रिंगिंग बेल्स कंपनीला अनेक समस्यांना सामोरे जाव लागत आहे. रिंगिंग बेल्सच्या नोएडास्थित कार्यालयावर उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाने छापा टाकून काही दस्तावेज जप्त केले होते.