गुढीपाडवा : बंगळुरू, चेन्नईनंतर अल्ट्रा-लक्झरी घरांचा मोर्चा मुंबईकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:08+5:302021-04-13T04:06:08+5:30
मुंबई : बंगळुरू आणि चेन्नईनंतर मुंबई महानगर क्षेत्रात अल्ट्रा-लक्झरी विभागात काही विकासक दाखल होत असून, अल्ट्रा-लक्झरी घरांची नवी ...
मुंबई : बंगळुरू आणि चेन्नईनंतर मुंबई महानगर क्षेत्रात अल्ट्रा-लक्झरी विभागात काही विकासक दाखल होत असून, अल्ट्रा-लक्झरी घरांची नवी श्रेणी आहे. पर्यावरणस्नेही, भविष्यासाठी सज्ज आणि अतिशय खास घरे पुरवण्यावर गृहनिर्माण क्षेत्रातील छोटे आणि मोठे विकासक जोर देत आहेत, अशी माहिती गुढीपाडव्याच्या निमित्ताने गृहनिर्माण क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी दिली.
मुंबईच्या विस्तारामध्ये वाढत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेची भूमिका लक्षणीय असून, गेल्या काही महिन्यात लक्झरी हाऊसिंग विभागात प्रगती होत आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील अभ्यासक आशिष आर. यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू फिरू लागल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी जोर धरू लागली आहे. देशातील सर्वात मोठ्या, वृद्धिंगत होत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक असलेल्या मुंबईत अनेक विकासक पाय रोऊ पाहत आहेत. दरम्यान, प्रिमियम घरे व व्यावसायिक जागा विकसित करण्यावरदेखील भर दिला जात आहे. परवडण्याजोग्या किमतींची घरे विकसित केली जात आहेत.
--------------
अल्ट्रा-लक्झरी घरे
- मोकळ्या हिरवाईसाठी मोठमोठाल्या जागा
- अत्याधुनिक घर तंत्रज्ञान
- सौंदर्य, आधुनिकता, सुविकास