कसणाऱ्या जमिनींसाठी गनिमी काव्याने आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:00 AM2018-10-26T06:00:10+5:302018-10-26T06:00:32+5:30

राज्यातील गायरान, वनजमीन, माळरान जमिनी कसणाºया आदिवासी शेतक-यांच्या नावावर करण्याची मागणी करत भारतीय आदिवासी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Guerrilla Poetry Movement | कसणाऱ्या जमिनींसाठी गनिमी काव्याने आंदोलन

कसणाऱ्या जमिनींसाठी गनिमी काव्याने आंदोलन

Next

मुंबई : राज्यातील गायरान, वनजमीन, माळरान जमिनी कसणाºया आदिवासी शेतक-यांच्या नावावर करण्याची मागणी करत भारतीय आदिवासी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकवरून शेकडो किलोमीटर चालत आल्यावरही शासन जमिनी नावावर करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष दि. ना. उघडे यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उघडे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक तहसील, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रातील आदिवासींकडून कसण्यात येणारी वनजमीन, गायरान, माळरान जमीन संबंधित कसणाºया आदिवासी शेतकºयाच्या नावावर करावी या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र केवळ आश्वासने मिळत आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने आता शासनाविरोधात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. आंदोलनाच्या व्याप्तीवर येत्या आठवड्यात होणाºया बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

Web Title: Guerrilla Poetry Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.