मुंबई : राज्यातील गायरान, वनजमीन, माळरान जमिनी कसणाºया आदिवासी शेतक-यांच्या नावावर करण्याची मागणी करत भारतीय आदिवासी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकवरून शेकडो किलोमीटर चालत आल्यावरही शासन जमिनी नावावर करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष दि. ना. उघडे यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उघडे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक तहसील, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रातील आदिवासींकडून कसण्यात येणारी वनजमीन, गायरान, माळरान जमीन संबंधित कसणाºया आदिवासी शेतकºयाच्या नावावर करावी या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र केवळ आश्वासने मिळत आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने आता शासनाविरोधात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. आंदोलनाच्या व्याप्तीवर येत्या आठवड्यात होणाºया बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
कसणाऱ्या जमिनींसाठी गनिमी काव्याने आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 6:00 AM