Join us

पाहुण्यांनी केले मुंबई मेट्रोचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 3:25 AM

: परदेशात कार्यरत असलेले भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाची गुरुवारी सकाळी पाहणी के

मुंबई : परदेशात कार्यरत असलेले भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाची गुरुवारी सकाळी पाहणी केली. परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय उच्चाधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य दौºयाचा मेट्रो प्रकल्प पाहणी हा एक भाग होता. त्यांना मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाविषयीची सखोल माहिती करून देणे हा या भेटीमागचा उद्देश होता.या दौºयादरम्यान उच्चाधिकाºयांनी मेट्रोमध्ये वापरण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान, अंमलबजावणीतील आव्हाने आणि प्रकल्पाची सर्वांगीण उपयुक्तता यांची माहिती घेतली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो मार्ग-३च्या प्रकल्पाची सविस्तर माहिती आणि सादरीकरण या वेळी या उच्चाधिकाºयांना दिले. या प्रकल्पाची माहिती घेतल्यावर या सर्व परदेशी पाहुण्यांनी मेट्रो-३ प्रकल्पाबाबत प्रशासनाचे कौतुक केले.या वेळी सौदी अरेबियातील भारतीय राजदूत अहमद जावेद, कोलंबियातील राजदूत रवी बांगर, बेलारुसमधील राजदूत संगीता बहादूर, डेन्मार्कमधील राजदूत अजित गुप्ते, ट्यूनेशियातील राजदूत प्रशांत पिसे, कोरियातील राजदूत अतुल एम. गोतसुर्वे, तुर्केमिनिस्थानातील राजदूत अझर ए. एच. खान, आॅस्ट्रेलियातील राजदूत डॉ. अजय एम. गोंदाणे, फिजीचे भारतीय उच्च्यायुक्त विश्वास विदू सपकाळ हे अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुंबई मेट्रोतर्फे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता, नियोजनचे कार्यकारी संचालक आर. रमणा आणि कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.राजदूत आणि उच्चायुक्त यांचा हा पाहणी दौरा मेट्रो-३ टीमसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमात मुंबई मेट्रो मार्ग-३चा समावेश केला ही अभिमानाची बाब आहे, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.