ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून दिंडोशीच्या मुलींना दिले 'बॅड टच अन् गुड टच' चे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 08:34 PM2020-12-05T20:34:40+5:302020-12-05T20:34:52+5:30
दिंडोशीतील सुमारे 315 विद्यार्थिनीनी यात सहभाग घेतला.
मुंबई: मुलांना लैंगिक अत्याचारापासून बचावासाठी पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अंकित सुनिल प्रभु यांच्या मार्गर्शनाखाली दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील शालेय मुलींसाठी आणि पालकांसाठी 'गुड टच अँड बॅड टच' अर्थात 'चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ' या महत्त्वाच्या विषयावर आज ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडोशीतील सुमारे 315 विद्यार्थिनीनी यात सहभाग घेतला. मुंबईतील अश्या प्रकरचा हा पहिला उपक्रम असंल्याची माहिती अंकित प्रभू यांनी लोकमतला दिली. यावेळी जिजामाता विद्या मंदिर, महाराणी सईबाई विद्या मंदिर, शिवाजी विद्या मंदिर, गुरूकुल विद्यालय, हरणाई विद्यालय इत्यादी शाळेतील ३१५ मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराला वरिष्ठ शिक्षिका अनघा साळकर यांनी मार्गर्शन केले.
असा समजावला 'बॅड टच आणि गुड टच'!
मुलांना वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श समजावून सांगण्यासाठी, मुलींना केवळ शाब्दिकच नाही तर व्यावहारिक स्वरुपात देखील शिकवणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांच्या बाबतीत जर काही चुकत असेल तर ते लगेच त्यावर ॲक्शन घेऊ शकतात. जर मुलांच्या बाबतीत असे घडले तर त्यांना ताबडतोब कुटुंबीयांना किंवा आसपासच्या लोकांना सांगावे. जर कोणी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना धमकवाले. जर समोरच्याने कोणालाही सांगू नका अशी धमकी दिली तर त्याला बॅड टच म्हणतात हे मुलांना समजावले. आणि असं काही झाल्यास आधी पालकांना येऊन सांगा अशी समज दिली.
गुड टच बाबत मुलांना समजावून सांगितले की जर एखाद्याने त्यांना प्रेमाने स्पर्श केला, ज्यामुळे त्यांना चांगले आणि निश्चिंत वाटेल तर तो एक चांगले स्पर्श आहे.जर मुलींना स्पर्शांचा अनुभव आला आणि जर स्पर्श तुम्हाला नकोसा वाटत असेल तर तुम्ही त्याचा विरोध करायला शिकायला हवे असे मुलांना समजावण्यात आले अशी माहिती अनघा साळकर यांनी दिली.