मुंबई: अंधेरी (पूर्व ) येथील छत्रपती संभाजीनगर मधील वक्रतुंड वन बी या सोसायटी चे हळदीकुंकू मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अंधेरीपोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने येथील 350 महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायद्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी अंधेरी पोलीस ठाणे मधील निर्भया पथक महिला अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पूनम मिरगणे व त्याचप्रमाणे म पो शि स्नेहल चव्हाण यांनी महिलांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. याचा निश्चित फायदा छत्रपती संभाजी नगर मधील महिलांना फायदा होणार असल्याचे येथील हळदी कुंकूसाठी आलेल्या महिलांनी सांगितले.
छत्रपती संभाजी नगर मधील साडेतीनशे महिलांना सायबर क्राईम, घरगुती हिंसाचा गुड टच बॅड टच ,साठी कोणत्या नंबर वर कॉल करायचा, अन्याय सहन करणे अन्याय विरुद्ध वाचा फोडणे या विविध विषयांवर त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा येथील महिलांना झाला. वक्रतुंड वन सोसायटीचा महिला मंडळ दरवर्षी महिलांना हळदी कुंकू निमित्त वेगवेगळे प्रोग्राम करत असतात ज्याचा महिलांना सामाजिक बांधिलकी म्हणून उपयोग होतो .अनेक कार्यक्रम सोसायटी च्या माध्यमातून तेथील महिलांसाठी होत असतात आणि यामध्ये वक्रतुंड वन बी च्या महिला हिरहिरीने सहभागी होतात अशी माहिती येथील सोसायटीच्या सचिव सुनीता नागरे यांनी दिली. या सोसायटीच्या अध्यक्ष व सेक्रेटरी आणि सर्व सोसायटी च्या महिलां अंधेरी पोलीस ठाणेच्या निर्भया पथकाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.