पोलीस ठाण्यात विद्याथ्र्याचे मार्गदर्शन

By Admin | Published: November 13, 2014 01:10 AM2014-11-13T01:10:18+5:302014-11-13T01:10:18+5:30

तक्रार-अर्ज-गा:हाणो घेऊन पोलीस ठाण्यात आल्यावर संशयी नजरांऐवजी हस:या चेह:याने झालेले स्वागत, खोचक प्रश्नांच्या सरबत्तीऐवजी योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर.?

The guidance of the student in the police station | पोलीस ठाण्यात विद्याथ्र्याचे मार्गदर्शन

पोलीस ठाण्यात विद्याथ्र्याचे मार्गदर्शन

googlenewsNext
>मुंबई : तक्रार-अर्ज-गा:हाणो घेऊन पोलीस ठाण्यात आल्यावर संशयी नजरांऐवजी हस:या चेह:याने झालेले स्वागत, खोचक प्रश्नांच्या सरबत्तीऐवजी योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर.? तेही साध्या गणवेशातल्या महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून! 1क् नोव्हेंबरपासून शहरातल्या 93 पोलीस ठाण्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तक्रारदारांना हस:या चेह:याने, आपुलकीने माहिती देताना दिसतील. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. 
पोलीस ठाण्यात आल्यावर तक्रारदाराचे हसतमुखाने स्वागत व्हावे, तक्रारीनुसार त्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात हेल्प डेस्क सुरू करण्यात आला. या डेस्कवर महिला पोलिसांची नेमणूक केली. अत्याचाराची तक्रार घेऊन आलेल्या महिलांना विश्वास वाटावा, हा त्यामागील हेतू होता. या डेस्कवर महाविद्यालयीन विद्यार्थी बसले आणि त्यांनी आलेल्यांना माहिती पुरवली तर हा डेस्क आणखी लोकाभिमुख होईल, अशी कल्पना आयुक्तांना सुचली. 
विद्यार्थी-विद्यार्थिनी साध्या गणवेशात असतील. पोलीस ठाण्यात आल्या आल्याच जर या विद्याथ्र्याकडून स्वागत झाले तर तक्रारदारांना पोलीस ठाण्यातल्या तथाकथित तणावपूर्ण वातावरणाच्या कल्पनेने निर्माण झालेला धाक निवळेल. तक्रारदार ‘कम्फर्टेबल’ होईल. तक्रारदार स्वत:हून पुढे येतील. या तक्रारींवर कारवाई झाली की गुन्हेगारीही कमी होईल, असा विश्वास मारिया यांना आहे.
हे विद्यार्थी कोण असतील या ‘लोकमत’च्या प्रश्नावर मारिया म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) किंवा महाविद्यालयातील मराठी प्रबोधन, कल्चरल फोरम यासारख्या विविध विभागांमधून सुमारे 2क्क् विद्यार्थी निवडले. घर आणि महाविद्यालयाजवळील पोलीस ठाण्यात सुमारे सहा ते नऊ विद्यार्थी तक्रारदारांच्या स्वागताची, त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडतील. चार तासांच्या पाळ्यांमध्ये हे विद्यार्थी काम करतील. 
हा एक प्रयोग आहे. ठरावीक काळानंतर हा प्रयोग किती परिणामकारक आहे याचा आढवा घेऊ आणि भविष्यात हा उपक्रम सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेऊ, असे मारिया यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) 
 
मारिया यांनी महिला, अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजवर कसोशीने प्रय} केले. 
गुन्हा नोंदविताना हद्दीचा वाद न घालता आधी तक्रारदाराची तक्रार नोंदवा, गुन्हा दाखल करून तो संबंधित पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी वर्ग करा, ही महत्त्वपूर्ण सूचना मारिया यांनी केली व यासाठी ते आग्रही आहेत.
पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद वाढली तर चिंता करू नका, मात्र गुन्हे दाबू नका, असा विश्वासही मारिया यांनी तमाम पोलीस ठाण्यांना दिला.
महिला, अल्पवयीन मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मारिया यांनी अमलीपदार्थ सेवन करणारे व तस्करी करणा:यांविरोधात धडक मोहीम उघडली. नशिली औषधे विकणा:या केमिस्टांवर कारवाईचे आदेश दिले. 
 
लोकसेवा हे माझे उद्दिष्ट आहे. घडलेला प्रत्येक गुन्हा, होणारा प्रत्येक अत्याचार पोलीस ठाण्यात नोंद व्हावा. तसे झाले तरच पोलिसांना प्रत्येक गुन्हेगारावर कारवाई करता येईल आणि शहरातली गुन्हेगारी रोखता येईल. मात्र पोलीस ठाण्याबाबत सर्वसामान्यांच्या मनात असलेला गैरसमज दूर होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच नवनवीन प्रयोग सुरू आहेत.
राकेश मारिया, पोलीस आयुक्त, मुंबई

Web Title: The guidance of the student in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.