घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखा - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:06 AM2021-07-17T04:06:11+5:302021-07-17T04:06:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्येष्ठ नागरिक, विकलांग व अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखण्याबाबत ...

Guidelines for door-to-door vaccination - High Court | घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखा - उच्च न्यायालय

घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखा - उच्च न्यायालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, विकलांग व अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखण्याबाबत राज्य सरकार करत असलेली प्रगती समाधानकारक नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

राज्य सरकार २० जुलैपर्यंत मार्गदर्शक तत्त्वे आखेल, अशी आमची अपेक्षा आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.

लस घेण्यास इच्छुक असलेल्या अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींची माहिती राज्य सरकारने सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेकडून मागितली आहे आणि आम्हाला १३,५८४ लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली.

ही संख्या मोठी नाही. सरकारने वृत्तपत्रांद्वारे या प्रस्तावाला प्रसिद्धी द्यावी. आतापर्यंत सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखायला हवी होती किंवा धोरण आखायला हवे होते. आम्हाला योग्य ती मारदर्शक तत्त्वे हवी आहेत. अन्यथा लसीकरण मोहिमेला विलंब होईल. राज्य सरकारच्या या प्रगतीवर आम्ही समाधानी नाही, असे न्यायालयाने म्हटले.

ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात व्यवसायाने वकील असलेल्या धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर पुढील सुनावणी २० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Guidelines for door-to-door vaccination - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.