मुंबई : राज्यात जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान स्वाइन फ्लूमुळे २६८ जणांचा मृत्यू झाला असून, ३२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे गुरुवारी जाहीर केली आहेत.विलंबाने उपचार होत असल्याने स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. टॅमीफ्लूच्या गोळीचा दुष्परिणाम जाणवत नसून, खासगी डॉक्टरांनी तिचा वापर करावा. तसेच नेमक्या कोणत्या तापमानात स्वाइन फ्लूचे विषाणू वाढतात याचादेखील अभ्यास करावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केले. राज्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना ही मार्गदर्शक तत्त्वे पाठविण्यात येणार असून, त्यानुसार स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केले. या मार्गदर्शक तत्त्वात तीन विभागांत उपचारपद्धती विभागली आहे. पहिल्या विभागात रुग्ण विभागणी, दुसºयात प्रौढ रुग्णांवरील उपचार तर तिसºया विभागात लहान मुलांवरील उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.>राज्यात स्वाइनचे२ हजार ३०० रुग्णराज्यात सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेले सुमारे २ हजार ३०० रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ डेंग्यूचे सुमारे ६ हजार ९00 रुग्ण आहेत. डेंग्यूमुळे या वर्षी आतापर्यंत सुमारे २९ मृत्यू झाले आहेत. स्वाइन फ्लूचे ६0 टक्के रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.मार्गदर्शक तत्त्वे>भाग अ : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची विभागणीसौम्य स्वरूपाचा ताप आणि घशाची समस्या या व अन्य आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत औषधोपचारानंतर २४ ते ४८ तासांत सुधारणा न झाल्यास त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने टॅमीफ्लू द्यावी.रुग्णांना घरी आराम करण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला द्यावा.भाग ब : प्रौढांवर स्वाइन फ्लूचे उपचारजास्त ताप आणि घशाची तीव्र समस्या जाणवत असेल तर अशा रुग्णांना आॅसेलटॅमिवीर द्यावे आणि त्यांना घरी आराम करण्याचा सल्ला द्यावा.भाग क : लहान मुलांवर स्वाइन फ्लूचे उपचारलहान मुलांमध्ये जास्त झोप येणे, सतत येणारा ताप, आळस, श्वास घेण्यात अडथळे अशी तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे.
स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 5:31 AM