मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली आहे. अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांची भूमिकाही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. शिवाय, निर्णयाकडे सकारात्मकतेने पाहून याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे कठोर करण्याची गरज व्यक्त केली.काळानुरूप योग्य निर्णयउशीर झाला असला तरी काळानुरूप हा अत्यंत योग्य निर्णय आहे. याविषयी जनहित याचिकाही दाखल केली होती, राज्यभरात जनजागृतीचे कामही सुरू आहे. संविधानातील कलम २१मध्ये मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, रुग्णशय्येवर जगताना हा अधिकार अबाधित राहतो का, हा मुद्दा होता. आता या निर्णयामुळे हे ठरवण्याचा हक्क मिळाला आहे. जिवंत असताना ‘इच्छापत्र’ बनविण्याचा हक्क या निर्णयामुळे मिळाला आहे. याविषयी कायदा होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे दिशादर्शक ठरतील.- असीम सरोदे, विधिज्ञनिर्णय ऐतिहासिकसर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता मिळाली आहे. हा एक प्रकारचा लिखित दस्तऐवज आहे. ज्यात एखाद्याला गंभीर आजार किंवा बरे न होण्या-सारख्या परिस्थितीत मृत्युशय्येवर असताना कोणता प्रकारचा उपचार करण्यात यावा, हे जिवंत असतानाच लिहिता येणे शक्य होईल. मृत्युशय्येवर असलेली व्यक्ती मुक्तीसाठी डॉक्टरांच्या मदतीने इच्छामरणाची मागणी करू शकते.- डॉ. रूपकुमार गुरसहानी, मेंदूविकारतज्ज्ञपुरोगामी निर्णयअरुणा शानबाग यांच्या वेळेस हा निर्णय द्यायला हवा होता असे वाटते. उशीर झाला असला तरी हा निर्णय दिला त्यातून पुरोगामित्व सिद्ध झाले आहे.- संध्या गोखले, सामाजिक कार्यकर्त्यामार्गदर्शक तत्त्वांच्या प्रतीक्षेतसर्वोच्च न्यायालयाचे खूप आभार. या निर्णयामुळे असंख्य लोकांना दिलासा मिळाला आहे. या लढाईत माझा खारीचा वाटा असल्याचा अभिमान आहे. मात्र, आता मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रतीक्षेत सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. ज्यामुळे याची अंमलबजावणी करणे सोपे जाईल.- पिंकी विरानी, सामाजिक कार्यकर्त्यानिश्चित आराखडा हवाकेवळ अपवादात्मक प्रकरणात हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे. सरकारने लवकरच याविषयी पावले उचलून इच्छामरणाच्या प्रक्रियेचा आराखडा बनविला पाहिजे.- डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदडॉक्टरांची भूमिकाही महत्त्वाचीमृत्युशय्येवर असणाºया रुग्णांसाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. अशा वेळेस डॉक्टरांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. काहीसा उशीर झाला असला तरी हा निर्णय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.- डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण
‘इच्छामरणा’बाबत मार्गदर्शक तत्त्वे कठोर हवीत, तज्ज्ञांकडून निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 7:10 AM