बदलापूरच्या स्केटर्सच्या विश्वविक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:32 AM2018-12-26T04:32:08+5:302018-12-26T04:32:25+5:30
बदलापूरच्या नवोदित आणि युवा स्केटर्सनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््समध्ये आपली नोंद करून घेताना तब्बल ४८ तास सलग स्केटिंग करण्याचा जागतिक विक्रम नोंदवला.
मुंबई : बदलापूरच्या नवोदित आणि युवा स्केटर्सनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््समध्ये आपली नोंद करून घेताना तब्बल ४८ तास सलग स्केटिंग करण्याचा जागतिक विक्रम नोंदवला. बेळगाव येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत बदलापूरच्या सूरज स्केटिंग अकादमीच्या माध्यमातून हा विक्रम रचला गेला.
बदलापूर परिसरातील कार्मेल, फातिमा, होली राइट, भारत महाविद्यालय आणि केळकर महाविद्यालय (मुंबई) या शाळा-महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. गिनीज बुकमध्ये नाव नोंदविण्याच्या निर्धारानेच सहभागी झालेल्या या स्पर्धेत बदलापूरच्या स्केटर्सनी सलग ४८ तास स्केटिंग करत आपले लक्ष्य साध्य केले.
या कामगिरीची नोंद गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी घेतली असून लवकर या खेळाडूंना त्यांच्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत देवेश गर्गे, भक्ती प्रधान, अनमोल प्रजापती, यश चौपडा, विघ्नेश पवार, बालमानी पिल्ले, सिद्धि सूर्यवंशी, दृष्टी बीजे, कोमल काटकोळे, सूरज गरवालीया, वेदांत सारंग, ओम्कार देशमुख, सौरभ कुलकर्णी, स्वामी म्हात्रे आणि आयुष्य चारी यांनी हा विश्वविक्रम नोंदवण्यात आपले योगदान दिले.