Gujarat Election Result 2022 Live: "सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:39 AM2022-12-08T11:39:17+5:302022-12-08T11:40:10+5:30

Gujarat Elections & Mumbai BMC: भाजपाच्या महाराष्ट्रातील मंत्र्याचा उद्धव ठाकरेंसह मविआला थेट इशारा

Gujarat Assembly election result 2022 Live Updates BJP Minister Mangalprabhat Lodha says BJP will win in Mumbai BMC elections just like Guj polls | Gujarat Election Result 2022 Live: "सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार"

Gujarat Election Result 2022 Live: "सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार"

Next

Mangal Prabhat Lodha reaction on Gujarat Election Result 2022 Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा गड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू हाती येत आहेत. पहिल्या दोन-तीन तासांच्या मतमोजणीत सुरूवातीच्या कलांनुसार भाजपाने विक्रमी मुसंडी मारल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत धक्कादायकरित्या जागा कमी झाल्यानंतर, या निवडणुकीत भाजपाने भलतीच गरूडझेप घेतल्याचे चित्र आहे. १४०+ चा नारा देणारा भाजपा, गुजरातमध्ये हळूहळू दीडशतकापार पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे. अंतिम निकाल अद्याप हाती आलेले नसले तरीही राज्यात भाजपाची एकहाती सत्ता येणार हे स्पष्ट आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मविआला थेट इशाराच दिला आहे. गुजरात ही फक्त नांदी असून मुंबई मनपामध्येही (Mumbai BMC Elections) असंच घडेल असे ते म्हणाले आहे.

"पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या निर्णयक्षमता, कार्यकुशलता यांस आम्हा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रणाम. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १० दिवसांपेक्षा जास्त वेळ तेथे राहून प्रचार केला, गुजरातमधील कार्यकर्त्यांनी देखील परिश्रम घेतले, त्याचाच हा विजय. मोदीजींवर गुजरातच्या जनतेने श्रद्धा दाखवली आहे. एक नवा इतिहास सुरू झाला आहे. आज गुजरातमध्ये एकहाती विक्रमी विजय मिळवला जात आहे. गुजरातमध्ये जे काही घडलंय तेच उद्या मुंबई महानगर पालिकेमध्ये घडणार आहे. ही फक्त नांदी आहे, सर्वांनी ऐकून घ्या," असा इशारा देत मंगलप्रभात लोढा यांनी पालिका निवडणुकांवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला डिवचले.

दरम्यान, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने इतर पक्षांसोबत चर्चा करून सामंजस्याने निवडणूक लढवायला हवी होती. पण बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या आणि भाजपा आम्हाला द्या अशा पद्धतीचे 'डील' झाले असावे अशी लोकांना शंका असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला. "तीन प्रमुख निवडणुकांमध्ये दिल्ली भाजपाच्या हातून गेलं, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने टक्कर दिल्याने भाजपाला संघर्ष करावा लागतोय तर गुजरात मध्ये बाजी त्यांची आहे. आम्ही तिनही पक्षांचे अभिनंदन करतो. पण ज्याप्रकारचे निकाल आले आहेत, त्यात दोन पक्षांमध्ये 'डील' झाली होती की काय, असा संशय लोकांना येऊ लागलाय," असं रोखठोक मत राऊतांनी मांडले.

Web Title: Gujarat Assembly election result 2022 Live Updates BJP Minister Mangalprabhat Lodha says BJP will win in Mumbai BMC elections just like Guj polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.