Join us

गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही...; उद्धव ठाकरेंकडून टोमणा मारत भाजपाचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 4:33 PM

गुजरातमध्ये न भूतो, न भविष्यती असे यश भाजपने मिळवले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एवढे यश मिळाले नव्हते तेवढे मोदींच्या प्रभावामुळे मिळाले आहे.

Gujarat Election Result 2022: गुजरातमध्ये न भूतो, न भविष्यती असे यश भाजपने मिळवले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एवढे यश मिळाले नव्हते तेवढे मोदींच्या प्रभावामुळे मिळाले आहे, भाजपाला १८२ पैकी १५४ जागांवर यश मिळत आहे. तर काँग्रेससाठी एवढी मोठी नामुष्की आजवर आलेली नव्हती, त्यांना १९ जागा मिळताना दिसत आहेत. यावर आता भाजपला देशभरातून शुभेच्छा मिळत. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुभेच्छा देत भाजपचे कौतुक केले आहे. 

गुजरात निवडणुकीबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अभिनंदन करतो, गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासीक आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच अभिनंदन केलेले आहे.

Gujarat Election Result 2022: गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? भाजपाकडून शपथविधीच्या हालचाली; मोदी, शहा येणार

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

'गुजरात निवडणूक विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करतो, गुजरातसोबत हिमाचलचा निकाल लागला. यात काँग्रेसने विजय मिळवला आहे, असंही यात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिल्ली मनपा निवडणुकीत आपने भाजपवर मात केले यावर आपचेही अभिनंदन केले आहे. 

गुजरातचा हा निकाल अपेक्षित होता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाच निवडणूक झाली. या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही जोरदार पळाले असतील अस दिसत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.  पंतप्रधान मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत, मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन येथेही घोषणा करतील ही अपेक्षा आहे. आप'ने गुजरातमध्ये मतांची विभागणी करुन भाजपचा मोठा फायदा करुन दिला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यात म्हटले आहे. 

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण?

गुजरातमध्ये सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची शक्यता आहे. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात बदल करून भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींनी पटेल यांना संधी दिली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने घवघवीत यश मिळाले आहे. यामुळे पुन्हा त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर मोदींचे धक्कातंत्र पाहता ते दुसऱ्या नेत्याला संधी देण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीय.

आज निकालाची प्रमाणपत्रे हाती आल्यानंतर १० किंवा ११ डिसेंबरला गुजरातमध्ये शपथविधी समारंभ होण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये हार्दिक पटेलसारख्या नेत्यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानरेंद्र मोदीभाजपागुजरात विधानसभा निवडणूक 2022