गुजरात एन्रिचमेंट संस्थेचा आज मुंबईत समारंभ
By admin | Published: July 2, 2017 04:15 AM2017-07-02T04:15:42+5:302017-07-02T04:15:42+5:30
येथील जैन समुदायाच्या जैन इंटरनॅशनल (जीओ) या संस्थेने गुजराती, मारवाडी आणि जैन समुदायासाठी गुजराती एन्रिचमेंट आॅर्गनायझेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येथील जैन समुदायाच्या जैन इंटरनॅशनल (जीओ) या संस्थेने गुजराती, मारवाडी आणि जैन समुदायासाठी गुजराती एन्रिचमेंट आॅर्गनायझेशन (जीईओ) ही नवीन संघटना स्थापन केली आहे.
या संघटनेचा लोकार्पण सोहळा रविवार, २ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या सोहळ्याला परमपूज्य गणीवर्य नयपद्मसागर महाराज तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उपस्थित राहणार आहेत.
आयोजित करण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्यास अनेक सनदी व बँक अधिकारी, न्यायाधीश, उद्योगपती, व्यापारी, चार्टर्ड अकाउंटंट, वकील तसेच अन्य मान्यवर लॉयर फेडरेशनचे अनेक मान्यवर सभासद तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गुजराती एन्रिचमेंट आॅर्गनायझेशन ही एक बिगर सरकारी (एनजीओ) संस्था आहे. ही संस्था मुख्यत्वे गुजराती, मारवाडी आणि
जैन समाजातील प्रतिभावंत लोकांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण
काम अव्याहतपणे करत आहे. अशा प्रकारे प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्याबरोबरच ही संस्था आरोग्य नि:स्वार्थ सेवा, सामाजिक सुरक्षा, आर्थिक विकास, वैवाहिक संपर्क, आर्थिक सहयोग, मूल्याधारित शिक्षण, संस्कार यासाठी मदत करणार आहे.