मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमधील माधोपूर येथील गुज्जर समाजाच्या वतीने ८ फेब्रुवारीपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी तंबू लावून रेल्वे रुळावर तळ ठोकला आहे. महिला रेल्वे रुळावर बसून आंदोलन करीत आहेत. परिणामी, उत्तरेकडे जाणारा रेल्वे मार्ग विस्कळीत झाला असून अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.गुज्जर आंदोलनामुळे १५ फेब्रुवारी रोजी काही मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलले आहेत. गाडी क्रमांक १२९२५ वांद्रे टर्मिनस ते अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस नागदा-कोटा-सवाई माधोपूर या मार्गाऐवजी चंदेरिया-जयपूर-रेवाडी या मार्गाने चालविण्यात येणार आहे. याच दिवशी म्हगाडी क्रमांक २२४४४ वांद्रे टर्मिनस ते कानपूर सेंट्रल एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२२४५ वांद्रे टर्मिनस ते निजामुद्दीन युवा एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.१८ फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक १२३१६ उदयपूर सिटी ते कोलकाता अनन्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
गुज्जर आंदोलनाने मेल, एक्स्प्रेसच्या मार्गांत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:13 AM