गुज्जर आंदोलनाने मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले; लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:09 AM2019-02-12T02:09:16+5:302019-02-12T02:09:32+5:30
मराठा समाजाप्रमाणे स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी गुज्जर समाजाने आंदोलन छेडले आहे. गुज्जर समाजातील आंदोलकांनी रेल्वे रुळांचा ताबा घेत जयपूरमध्ये अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रोखल्या आहेत.
मुंबई : मराठा समाजाप्रमाणे स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी गुज्जर समाजाने आंदोलन छेडले आहे. गुज्जर समाजातील आंदोलकांनी रेल्वे रुळांचा ताबा घेत जयपूरमध्ये अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रोखल्या आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली येथून सुटणाºया काही मेल, एक्स्प्रेस रद्द तर काही मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे. ९ फेब्रुवारीपासून आंदोलनाने तीव्र वळण घेतले आहे. आंदोलनकर्त्यांनी सरळ रेल्वे रूळच अडविले. त्यामुळे ९ फेब्रुवारीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत येथील मार्ग विस्कळीत झाला आहे. ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत या मार्गावरील मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, लखनऊ जंक्शन-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, कोटा-हजरत निजामुद्दीन, कोटा-जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-हजरत निजामुद्दीन गरीब रथ या फेºया मागील तीन दिवसांपासून रद्द केल्या होत्या.
आज या गाड्या रद्द
वांद्रे टर्मिनस-डेहराडून एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-फिरोझपूर जनता एक्स्प्रेस, फिरोझपूर जनता एक्स्प्रेस-मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस-वांद्रे टर्मिनस.
वांद्रे टर्मिनस-गोरखपूर अवध एक्स्प्रेस, गोरखपूर अवध एक्स्प्रेस-वांद्रे टर्मिनस, पुणे-हजरत निजामुद्दीन दुुरोन्तो एक्स्प्रेस.
१३ फेब्रुवारीला या गाड्या रद्द
वांद्रे टर्मिनस-डेहराडून एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल- फिरोझपूर जनता एक्स्प्रेस, फिरोझपूर जनता एक्स्प्रेस-मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल, अमृतसर गोल्डन टेम्पल मेल-मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन आॅगस्ट क्रांती, वांद्रे टर्मिनस-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-हरिद्वार एक्स्प्रेस.
१४ फेब्रुवारीला या गाड्या रद्द
फिरोझपूर-मुंबई सेंट्रल जनता एक्स्प्रेस, अमृतसर-वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेस.
१५ फेब्रुवारीला या गाड्या रद्द
गोरखपूर-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस, फिरोझपूर-मुंबई सेंट्रल जनता एक्स्प्रेस, अमृतसर-मुंबई सेंट्रल गोल्डन टेम्पल मेल, श्री माता वैष्णोदेवी कातरा-वांद्रे टर्मिनस स्वराज एक्स्प्रेस.
प्रवाशांसाठी विशेष सुविधा
मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, इंदौर या स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी मदतकार्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये मेल, एक्सप्रेस रद्द केल्याची माहिती, गाड्यांच्या मार्गात केलेला बदल यांची माहिती देण्यात येत आहे. कॅन्टीन दिवस-रात्र सुरू ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांना मदतीसाठी १३८ क्रमांकाची हेल्पलाइन उपलब्ध आहे.
मार्गात बदल
१२, १३ फेब्रुवारी रोजी तिरूवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्र्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. ही गाडी पनवेल-कल्याण-नाशिक रोड-भुसावळ-भोपाळ-बीना अशी जाईल.
१२ फेब्रुवारी रोजी एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन दुरोन्तो एक्स्प्रेस ही पनवेल-कल्याण-नाशिक रोड-भुसावळ-भोपाळ-बीना अशी चालविण्यात येईल.