मुंबई – भारतीय संविधानाच्या मूळ तत्वाशी इंदिरा गांधीनी प्रयत्न केला होता, परंतु सुप्रीम कोर्टाने न्याय दिला, कुठल्याही सरकारने आरक्षणवाढीसाठी पुढाकार घेऊ नये, देशातील ब्राह्मण, वाणी, गुजराती, सिंधी पाकिस्तानी आहेत का? ५० टक्के या गुणवंतांच्या जागा आहे त्यावर कुणाचाही अधिका नाही. सर्व जातीतील गुणवंत यातून पुढे येतात. बिहारमध्ये आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या माणसांशी आम्ही संवाद साधू, जर हा कायदा पारित झाला तर आम्ही बिहारच्या हायकोर्टात जाऊ असं सांगत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बिहारमधील वाढीव आरक्षणाला विरोध केला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अल्पसंख्याकांना आरक्षण असले पाहिजे, आरक्षण वाढवल्यानं खुल्या वर्गावर अन्याय होतो, बाबासाहेबांना कुणावरही अन्याय करायचा नव्हता. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या प्रकरणात जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य या खटल्यात स्पष्ट शब्दात ५० टक्क्यांच्या आरक्षण नसावे असं सांगितलंय, जर राजकीयदृष्ट्या, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आरक्षणाचे घाणेरडे राजकारण करणार असाल तर आम्ही याविरोधात आहोत. बिहारमध्ये दिलेल्या वाढीव आरक्षणाला आमचा विरोध असेल. बिहार राज्यपालांकडे आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आमचे ऐकल्यानंतरच नितीश कुमार यांनी कायदा म्हणून, विधेयक असो प्रस्ताव यावर सही करू नये अशी विनंती केली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत राजकीय पक्ष लोकशाहीत आपली भूमिका बजावत असतात, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानापेक्षा कुठलाही राजकीय पक्ष मोठा नाही. त्यामुळे डंके की चोटपर सांगतो, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. मतांसाठी वाढीव आरक्षणाचे राजकारण करू दिले जाणार नाही म्हणून वाढीव आरक्षण विरोधी समिती उभी राहिली आहे. संविधानाने मर्यादा घातल्या, हम करे सौ कायदा असं चालत नाही. आरक्षण अल्पसंख्याक राहिले पाहिजे बहुसंख्याक नाही ही स्पष्ट भूमिका आहे. राजकारण्यांनी राजकारण कायम केले, पण कुठेही यश आले नाही. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात जो खटला होता त्याला देशभरात अनेक राज्यात तपासले गेले. कुठेही बहुसंख्याक आरक्षण दिले जावे असं न्यायालयाने दर्शवले नाही असंही सदावर्ते म्हणाले.
दरम्यान, बाबासाहेबांचे विचार स्पष्टपणे लोकांमध्ये ठेवणे, गलिच्छ राजकारणाला दूर ठेवणे, मग उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीश कुमार यांची पिल्लावळे कायम मला बोलत राहतील परंतु मी मूळ विचारापासून दूर जाऊ शकत नाही. माझ्या गाड्या फोडल्या, माझा जीव गेला तरी बाबासाहेबांचे विचार संविधानासाठी काम करेन, संविधानाच्या पहिल्या पानावर रामराज्याची कल्पना होती. जगात २ संघ आहेत, एक भगवान गौतम बुद्ध आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांना मानणारा मी माणूस आहे. मला कुणाच्या जातीवर जायचे नाही. समानतेचे तत्व हे डोळसपणा आहे असं सदावर्ते यांनी सांगितले.