Join us

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते आरोपीच्या पिंजऱ्यात, दोन्ही वकिलांनी असा केला युक्तीवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 2:39 PM

यावेळी दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. त्यात, सरकारी पक्षाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली आहे. 

मुंबई - उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक केली आहे. त्यानंतर, आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. त्यात, सरकारी पक्षाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली आहे. तर सदावर्तेंचे वकिल महेश वासवानी यांनी सदावर्ते यांचा जामिन कोर्टात सादर केला. मात्र, या जामीन अर्जाला सरकारी वकीलांनी विरोध केला.

एसटी कामगारांच्या आंदोलनामागे दुसरा व्यक्ती आहे. काही व्यक्तींच्या चिथावणी खोर वक्तव्यांमुळे आंदोलन केले जाणार होते. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बाबतीत वारंवार वक्तव्य केली जात होती. रॉयल स्टोन येथेदेखील आंदोलन होणार होते. कामगारांच्या कालच्या हिंसक आंदोलनाचे सिसीटीव्ही फुटेज घटना स्थळाचे जप्त केले आहेत. यामागे काही लोकांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. 

अटकेतील ते एसटी कर्मचारीच आहेत का?

आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांत दोन पोलिस जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी 103 आंदोलक कर्त्यांना अटक केली आहे. त्यापैकी अनेकांनी खोटी नावे सांगितली असून पत्तेही चुकीचे सांगितले आहेत. त्यामुळे, त्यांची पुर्ण नावे आणि खरे पत्ते शोधून काढायचे आहेत. या अटक कर्मचाऱ्यांत खरंच एसटी कर्मचारी होते की, बाहेरचे कोणी होते, याचाही तपास करायचा आहे. म्हणून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. 

सदावर्तेंच्या वकिलांनी मांडलेली बाजू

मराठा आरक्षणा विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली. त्याबद्दलचा  युक्तीवाद सदावर्ते यांनीच न्यायालयात केला आहे. त्यामुळे, त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जात. विशेष म्हणजे आज सादर केलेल्या FIR मध्ये अनेक गोष्टी या मॅाडीफाईड केल्या गेल्या आहेत, अशी बाजू गुणरत्न सदावर्तेंचे वकिल महेश वासवानी यांनी न्यायालयात मांडली. 

बारामतीला जाऊन आंदोलन करणार असं गुणरत्न सदावर्ते बोलले होते. पण, घरात घुसून असं ते कधीच बोलले नाहीत. सदावर्तेंनी असं वक्तव्य प्रसार माध्यमांवर केलय असं पोलिस म्हणत आहेत. पण, एकाही प्रसार माध्यमांवर अस वक्तव्य दिसलंच नाही, अशी बाजूही वासवानी यांनी मांडली. विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा सदावर्ते कोर्टात होते. त्यानंतर ते घरी गेले, सदावर्ते घरी होते तेव्हा प्रसार माध्यमांना इंटरव्ह्युव देत होते, कुठेही पळून गेले नाहीत.

गुणरत्न सदावर्ते धरुन ११० आरोपी झाले आहेत. मात्र, वकील पत्रावर त्यांची सहीदेखील घेवू दिली गेली नाही. विशेष म्हणजे अटक आरोपी नाव व पत्ते द्यायला तयार आहेत, पण पोलिस घेत नाहीयेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी मांडली बाजू

- संदिप गायकवाड हे १०९ एस टी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत 

- एस टी कर्मचाऱ्यांचा उद्देश कोर्टाने समजून घेतला पाहिजे - एस टी कर्मचारी आहेत, ते आरोपी नाहीत - ५ महिन्यांपासून घरदार सोडून आंदोलनाला बसले आहेत - ते आंदोलनकर्ते आहेत

 

टॅग्स :गुन्हेगारीराष्ट्रवादी काँग्रेसन्यायालयशरद पवार