मुंबई - गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राजवळ तयार करण्यात येणाऱ्या जेट्टीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा मार्ग मरिन ड्राइव्ह येथे जोडला जाणार आहे़ त्यामुळे गिरगाव चौपटीहून मरिन ड्राइव्हला बोटीने जाणे श्क्य होणार आहे़ त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा जपणाºया सभागृहाच्या जागेवर भव्य कलादालन उभारण्यात येणार आहे. जेट्टीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला जागा दिल्यानंतर त्या बदल्यात राज्य शासनाकडून ५०० चौरस मीटर जागा गिरगाव येथे कोस्टल रोड प्रकल्पासाठी मिळणार आहे.बिर्ला क्रीडा केंद्रातील सभागृहाशी मराठी, गुजराती, हिंदी रंगभूमीच्या कलाकारांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे बंद असलेल्या या सभागृहाबाबत आपली भूमिका मांडण्याची सूचना नगरसेवकांनी केली. बंद असलेले सभागृह पुन्हा सुरू करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली. सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी प्रशासनाला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.गिरगाव येथे होणाºया बहुउद्देशीय जेट्टीमुळे मुंबईत वाहतुकीचे आणखी एक साधन निर्माण होईल, असा विश्वास उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी या वेळी व्यक्त केला.या ठिकाणी तयार होणाºया अद्ययावत कलादालनाचा आराखडा बनविण्यात आला आहे.याबाबत ७ जुलै रोजी आयुक्त प्रवीण परदेशी नगरसेवकांसमोर सादरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोस्टलरोडसाठी मिळणार जागाबिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी असलेले सभागृह गेल्या १९ वर्षांपासून बंद आहे. त्याची दुरुस्तीही करण्यात आली नाही. २०१५ मध्ये हे सभागृह तोडण्यात आले. त्या ठिकाणी नव्याने काम सुरू करण्यात आलेले नाही.गिरगाव येथे ६४७२.७६ चौरस मीटर जागेवर बिर्ला क्रीडा केंद्र्र आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४५०.१८ चौरस मीटर जागा बहुउद्देशीय जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ही जागा महापालिका मुंबई पोर्ट ट्रस्टला देणार आहे. या बदल्यात राज्य शासनाकडून ५०० चौरस मीटर जागाही पालिकेला गिरगाव येथे कोस्टल रोडसाठी मिळणार आहे.
गिरगाव-मरिन ड्राइव्ह करा नौकाविहार, जेट्टीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 2:36 AM