Join us

गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:30 PM

एकूण 200 स्पर्धक सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत सायन येथील गुरु नानक महाविद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला

मुंबई - सध्या सर्वत्र महोत्सवांचे वारे वाहत आहे. त्यात विद्यार्थ्यांना वेध लागतं ते महोत्सवांचे.अभ्यासासोबत वैविध्य उपक्रम करायला विद्यार्थ्यांना फार आवडतात आणि याच उपक्रमातून विद्यार्थी देखील घडत असतात. मुंबई मधील फोर्ट येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयाने दिनांक 10 ते 12 नोव्हेंबर,2022 रोजी आयोजित केलेल्या IKSHANA 2022 या मीडिया फेस्टची. विविध स्पर्धा आणि त्याचं सादरीकरण असलेल्या या फेस्ट मध्ये यंदा आकर्षण ठरलं ते म्हणजे शॉट फिल्म कॉम्पिटिशन. 

एकूण 200 स्पर्धक सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत सायन येथील गुरु नानक महाविद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांना रोख रु. 50,000/-, सन्मान चिन्ह देत निखिल चौरसिया, विष्णू अज्जी, हफसा खान, प्रणय खंडागळे, जॉर्डन सिंग, लावण्या खतरी, प्रेरणा खेमानी, सौरभ शर्मा, केवल दोशी, निशा उपाध्याय या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख अमरीन मोगर यांनी विद्यार्थीचे कौतुक केले व भविष्यात अशीच नवनवीन शिखरे गाठावी यासाठी शुभेच्छा दिल्या. याखेरीज महाविद्यालयाच्या प्राचार्या पुष्पिंदर भाटिया यांनी देखील विद्यार्थ्याना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.