गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 08:31 AM2018-07-27T08:31:35+5:302018-07-27T08:32:21+5:30

आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी करण्यात येते. देशभरात गुरु पौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. तर

Guru Satak Parabrahma, Tasam Shri Gurve Namah, A large crowd of devotees in Shirdi | गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

googlenewsNext

मुंबई - आज सर्वत्र गुरु पौर्णिमेचा फिव्हर पाहायला मिळत आहे. आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी करण्यात येते. देशभरात गुरु पौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. तर शिर्डीतील साई मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त शेगावलाही मोठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भारतात अनेक विद्वान गुरु होऊन गेले. मात्र, चार वेदांचा सखोल अभ्यास करुन जगाला वेदाचे महत्व सांगणारे पहिले गुरू म्हणून महर्षि वेद व्यास यांना मान मिळाला आहे. 

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर:,
गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः,

आपल्या शिक्षकांबद्दल आणि गुरुंबद्दल आदर ठेऊन गुरुचरणी नतमस्तक होण्यात येत आहे. आषाढी पौर्णिमेला गुरू महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता, त्यामुळेच या दिवशी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक आणि गुरु यांचे अन्यन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच व्यास पौर्णिमेला गुरु पौर्णिमा श्रद्धाभाव आणि गुरुप्रती आदर ठेवून साजरी होते. प्रत्येक धर्मामध्ये गुरुला मोठे स्थान देण्यात आले. हिंदू पुराणकथांनुसार क्षत्रिय महाभारतील धनुर्धारी योद्धा अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला गुरू मानले होते. या महायुद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती. या भगवदगितेला अनेकांनी गुरु ग्रंथ मानला आहे. त्यामुळेच भारतात गुरू पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिर्डीतील साई मंदिरात आणि शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. 

Web Title: Guru Satak Parabrahma, Tasam Shri Gurve Namah, A large crowd of devotees in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.