एनएच - ४८ वरून सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त, सात जणांना अटक

By मनीषा म्हात्रे | Published: January 12, 2024 07:29 PM2024-01-12T19:29:37+5:302024-01-12T19:29:44+5:30

गुन्हे शाखेची कारवाई.

Gutkha worth nine and a half crore seized from NH-48, crime branch action, seven arrested | एनएच - ४८ वरून सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त, सात जणांना अटक

एनएच - ४८ वरून सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त, सात जणांना अटक

मुंबई: मुंबईत अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेची धडक कारवाई सुरु असून, गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरून सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती कक्ष नऊचे प्रभारी पोलीस निरिक्षक दया नायक यांना मिळताच, त्यांच्या नेतृत्वात कक्ष नऊच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. डी. एन. नगर परिसरातून गुटख्याची अवैध वाहतूक करत असलेला एक ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण १ कोटी ६ लाखांचा गुटखा जप्त केला.

याच आरोपींच्या चौकशीतून मुंबईत गुटख्याचे आणखीन चार ट्रक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, दया नायक यांच्या नेतृत्त्वात तपास अधिकारी  सचिन पुराणिक,  दिपक पवार,उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील आणि अंमलदार  यांनी सापळा रचला. गुरुवारी पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या  हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर एकुण ४ मोठे ट्रक भरून प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. या चार ट्रकमध्ये एकुण ४०० मोठया गोण्यांमध्ये ४०० हजार छोट्या गोण्याभरून गुटखा पॅक करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ९ कोटी २६ लाख रुपये आहे. चारही ट्रक गुन्हे शाखेने जप्त केले आहे.

आतापर्यंतच्या कारवाईत एकूण १० कोटी ३२लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. या कारवाईत चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. हिरालाल वासु मंडल (५२), नासीर मोहम्मदअली यलगार (४०), जमीर मन्नन सैय्यद (३२) आणि संजय शाम खरात (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती.

Web Title: Gutkha worth nine and a half crore seized from NH-48, crime branch action, seven arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.