गटारगंगेलगत खानावळ

By admin | Published: September 2, 2014 11:04 PM2014-09-02T23:04:43+5:302014-09-02T23:04:43+5:30

बसस्थानकालगत असलेल्या गटारगंगेच्या बाजूला हातगाडय़ा थाटून त्या ठिकाणी खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे.

Gutterhouse | गटारगंगेलगत खानावळ

गटारगंगेलगत खानावळ

Next
प्रशांत शेडगे - पनवेल
बसस्थानकालगत असलेल्या गटारगंगेच्या बाजूला हातगाडय़ा थाटून त्या ठिकाणी खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडालेल्या या परिसरात उघडय़ावर ठेवण्यात आलेले पदार्थ विशेषत: प्रवाशांच्या माथी मारून त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. याकडे पालिकेचा आरोग्य विभाग त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. एसटी आगार आणि रस्ते विकास महामंडळाकडूनही चलती का नाम गाडी या उक्तीप्रमाणो धोरण आहे.
मुंबई आणि पुणो या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पनवेल शहराचे लवकरच महानगरात रुपांतर होण्याची चिन्हे आहेत. कोकण आणि मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी पनवेल एसटी आगार आहे. या ठिकाणाहून घाटमाथा आणि कोकणात जाणा:या येणा:या हजारो एसटी गाडय़ा थांबतात. पनवेल शहर आणि नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी घाटमाथ्यावरील जिल्हय़ातील मूळ रहिवासी असलेले लोक नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. ते सणवार, उत्सव, यात्र याचबरोबर लगAकार्याकरिता आपल्या मूळ गावी जातात. मुंबई आणि घाटमाथ्यावर जाणा:या येणा:या गाडय़ा काही वेळ थांबत असल्याने प्रवासी खाद्यपदार्थ या बसस्थानक परिसरातून खरेदी करतात. एकंदरीत या ठिकाणी बारमाही गर्दी असते. याचा फायदा उचलत महामार्ग आणि बसस्थानकालगत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हातगाडय़ा थाटल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जो नाला आहे त्यामध्ये सांडपाणीही सोडले जात असल्याने सतत या भागात दलदल असते. सांडपाणी त्याचबरोबर मुतारीतील घाण या नाल्यात सोडली जाते. परिणामी, स्वच्छतेचा बोजवारा तर उडत चालला आहेच, शिवाय  प्रचंड दरुगधीचे साम्राज्य येथे आहे. असे असतानाही या बाजूला भजी, वडापाव, जिलेबी, समोसा, चायनीज पदार्थ, भेळपुरी या खाद्यपदार्थाची विक्री होते.
अनेक हातगाडय़ांवर हे पदार्थ तळले आणि बनवले जातात. अस्वच्छतेचे आगार असलेल्या या ठिकाणी माशांचा प्रादुर्भाव असून त्या माशा खाद्यपदार्थावर बसतात. लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी बसस्थानकाच्या जवळ असलेल्या या हातगाडय़ांवरूनच पदार्थ खरेदी करताना दिसत आहेत. बस आगारातील उपाहारगृह बंद असल्याने प्रवाशांवर ही वेळ आली आहे.
 
लिंबू सरबताच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
4खाद्यपदार्थाबरोबरच गटारगंगेवर लिंबू सरबत आणि इतर शीतपेयांची विक्री केली जाते. लिंबू सरबत तयार करताना स्वच्छ पाणी वापरले जाते की नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 
4त्याचबरोबर ग्लासही चांगल्या पाण्याने धुतले जात नसल्याचे निदर्शनास येते. याशिवाय माशा आणि जीवजंतूचा वावर असल्याने लिंबू सरबताच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित होत आहे.
 
आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणचे खाद्यपदार्थ हानिकारक आहेत. त्याचबरोबर यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे एसटी, वाहतूक पोलीस आणि नगरपालिका या हातगाडय़ांविरोधात मोहीम हाती घेवून कारवाई करण्यात येईल.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका
 

 

Web Title: Gutterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.