गटारांची झाकणे गायब
By Admin | Published: August 1, 2014 03:00 AM2014-08-01T03:00:41+5:302014-08-01T03:00:41+5:30
मालाड पश्चिम येथील एस.व्ही. रोड येथे अनेक ठिकाणी गटारांची झाकणे गायब तर काहींची अर्धवट तुटलेली अवस्था झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
सायली कडू, मालाड
मालाड पश्चिम येथील एस.व्ही. रोड येथे अनेक ठिकाणी गटारांची झाकणे गायब तर काहींची अर्धवट तुटलेली अवस्था झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. पावसात पाणी साचत असल्याने यात पडून एखादा अपघात होऊ शकतो, तेव्हा वेळीच पालिकेने दखल घेऊन सर्व झाकणे बसवावीत, अशी नागरिकांकडून आशा व्यक्त केली जात आहे.
एस.व्ही. रोड येथून झकेरिया मार्गावर बरेच ठिकाणी रस्त्यावरील खड्डे, उघडी मॅनहोल्स आहेत. त्यामुळे येथे एखादा अपघात झाला तर त्यास नगरपालिका जबाबदार आहे, असा असंतोष नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पालिकेकडून आरसीसी झाकणे बसविण्याच्या सूचना दिल्या जातात. पण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या सिमेंटची झाकणे बसविल्यामुळे काही दिवसांतच त्यांचे तुकडे पडतात. काहींच्या लोखंडी सळ्या बाहेर
आल्या असल्याने मोठा धोका
निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्ता पूर्णपणे पाण्याने
भरून फुटपाथही दिसेनासे होत
आहेत. त्यामुळे फुटपाथवरून चालताना गटारात पडण्याची भीती असल्याने नागरिक शक्यतो मुख्य रस्त्याच्या कडेने चालणे पसंत करत आहेत.