विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संत साहित्य तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७चा राज्य शासनाचा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांना आज येथे घोषित करण्यात आला.संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पुरस्काराची घोषणा केली. यापूर्वी श्री.रा.चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु.म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रिटो, मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ. उषा देशमुख यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० आॅक्टोबर १९३४ रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी कुटुंबीयांच्या सोबतीने पंढरीची वारी सुरू केली.
निवृत्ती महाराज वक्ते यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार
By admin | Published: July 05, 2017 5:14 AM